नायगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने झेंडावंदन व भव्य आरोग्य शिबीर संपन्न !
✍ संतोष मोरे✍
माणगांव प्रतिनिधी
7276143020
माणगांव: दादर नायगाव विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वडाळा तालुकाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन व युनिकेअर हेल्थ सेंटर ह्यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडाळा तालुका वार्ड क्र.२०० चे अध्यक्ष: मनोजभाई माने व त्याच्या पत्नी सौ. ज्योती मनोज माने( अध्यक्षा मुद्रा महिला बचत गट) ह्या उभयतांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आला. तसेच भव्य आरोग्य शिबिराचे उदघाटन मुंबई काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष कमलाकर सारंग ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी मुंबईचे उपाध्यक्ष प्रभाकर चाळके, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मन देशनेहेरे, मुंबई सरचिटणीस नंदू शिवडीकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोंढे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष सचिन कांबळे, मंगेश म्हैसधूने, वार्ड क्र.१७८ चे अध्यक्ष दानवेल कंलपुड,वार्ड क्र.२०१ चे अध्यक्ष मनोहर म्हात्रे, हेमंत म्हात्रे, तालुका पदाधिकारी संजय कुडाळकर, योगेश मोरे, शिवाजी पवार, सुधीर फुलपगार, सिरील कस्ताना, जयेश कदम, रवी वस्त, यांनी प्रयत्न केले. ह्या शिबिरास माजी नगर सेवक सुनील मोरे, नगर सेविका सौ. उर्मिला पांचाळ, मुंबई काँग्रेस आय चे सरचिटणीस महेंद्र मुगणेकर, माझगाव डॉक पतपेढीचे संचालक राजेंद्र वाघमारे, समाजसेवक अनिल मोरे, प्रशांत माने, यांनी भेटी दिल्या. तसेच विभागातील शिशु विकास मंडळ स्थानिक मंडळांनी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.