विमान अपघातांचा केंद्र बिंदू ठरतोय नेपाळ

रमेश कृष्णराव लांजेवार                              

मो 9921690779

गेल्या 30 वर्षात आतापर्यंत 27 मोठे विमान अपघात नेपाळमध्ये झाल्याचे सांगितले जाते.यात 1992 मध्ये दोन मोठे अपघात झालेत.यात जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात 113 जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळुन त्यात 167 लोकांचा मृत्यू झाला होता.यावरून असे वाटते की नेपाळचे आकाश विमानांसाठी मृत्यूचा काळ ठरत असल्याचे दिसून येते.याचीच पुनरावृत्ती दिनांक 15 जानेवारी रविवारला दिसून आली.

यती एअरलाईन्सच्या एटीआर-72 विमानाने सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले 11 च्या सुमारास पोखरा विमानतळावर उतरत असताना जुन्या व नवीन विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले.यात 10 परदेशी नागरिकांसह 68 प्रवासी आणि 4 विमान कर्मचाऱ्यांसह एकुण 72 जणांचा मृत्यू झाला.यात पाच भारतीय सुध्दा होते.नेपाळमधली या भागातील ही घटना पहिली नसुन मे -2012 ला पोखराहून जोमसोमला जाणारे विमान जोमसोम विमानतळाजवळ कोसळुन 15 ठार झालेत, सप्टेंबर-2012 ला सीता एअरचे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपात्कालीन लॅंडिंग करतांना कोसळुन 19 ठार झालेत,फेब्रुवारी 2016 ला याच मार्गावर उड्डाण करणारे तारा एअरलाईन्सचे विमान टेकऑफ नंतर कोसळले यात 23 लोकांचा मृत्यू झाला,मार्च 2018 ला त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिका -बांग्लादेश विमानाचा अपघात झाला यात 51 ठार झालेत, मे-2022 ला नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यात तारा एअरचे विमान कोसळुन 22 जणांचा मृत्यू झाला. हे संपूर्ण अपघात एकाच मार्गावर झाल्याचे सांगितले जाते. जनुकाय नेपाळला विमान अपघातांनी जखडले की काय असे वाटत आहे.अशाप्रकारे विमान अपघातांच्या श्रेणीत नेपाळ अव्वल स्थानी असल्याचे दिसून येते हा अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि चिंताजनक विषय आहे.

आधुनिक युगात रस्ते अपघात ज्याप्रमाणे वाढत आहे त्याचप्रमाणे जगभरात विमान अपघातात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते.जगभरात गेल्या पाच वर्षांत विमान अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यात असंख्य जणांना आपले प्राण गमवावे लागले यात आपल्याला अनेक कारणे दिसून येतील.कारण वाढत्या हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिग, वाढते तापमान, ग्लेशियर वितळले,वाढते प्रदुषण आणि निसर्गाचा होणारा ह्यास यामुळे आकाशातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदलाव झाल्यामुळे विमानाचे अपघात वाढल्याचे दिसून येते.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या देशात विमान अपघात मोठ्या प्रमाणात होतांना दिसते यात प्रामुख्याने नेपाळ, इंडोनेशिया, इजिप्त, रशिया, पाकिस्तानसह अनेक देशांत आपल्याला विमान अपघात जास्त दिसून येते.

आकाशातील हवामान बदलामुळे  विमान अपघातच नाही तर पक्षांचेसुध्दा जगने व उडने अत्यंत कठीण झाले आहे त्यामुळे त्यांना अनेक कठीणाईचा सामना करावा लागतो व मृत्यूशी झुंजावे लागते.त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल की आकाशातील वाढत्या हवामानातील बदलामुळे पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण व विमानांचे अपघात यात दिवसेंदिवस वाढत आहे.याकरीता जगाने बदलत्या काळानुसार बदलत्या हवामानाकडे लक्ष केंद्रित करून निसर्गाला वाचविण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला पाहिजे.यामुळे आकाशातील हवामान स्थिर रहाण्यास मोठी मदत होईल.यामुळे विमान अपघातांवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल.याकरिता सर्वच स्तरातुन निसर्ग वाचविण्याचा प्रयत्न व्हायला हवेत.नेपाळमधील विमान अपघातात मृतांच्या भावपूर्ण श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here