माणगांवमध्ये १२ फेब्रुवारीला “सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षे यांची खास उपस्थिती

60

माणगांवमध्ये १२ फेब्रुवारीला “सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षे यांची खास उपस्थिती

माणगांवमध्ये १२ फेब्रुवारीला "सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षे यांची खास उपस्थिती

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव – महेश शेलार,
टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन, माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ६ वा. “सह्याद्री मॅरेथॉन २०२३” या जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेला “महाराष्ट्र केसरी २०२३” शिवराज राक्षे यांची उपस्थिती खास आकर्षण असणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असुन ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी सुरू आहे. २ फेब्रुवारी पर्यंत मॅरेथॉनसाठी प्रवेश स्वीकारला जाईल.

टी.डब्लू.जे माणगांव शाखा व्यवस्थापक मुनाफ मुकादम यांनी स्पर्धेबाबत माहिती देताना ही स्पर्धा आरोग्य, व्यायाम, क्रीडाप्रकार याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी “सह्याद्री मॅरेथॉन २०२३” स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले. फेब्रुवारी महिन्यात ही मॅरेथॉन होणार असून मॅरेथॉनची पूर्वतयारी सुरू आहे.

स्पर्धेसाठी ७ गट तयार करण्यात आले आहेत. १४ वर्षापर्यंत मुलींना २ किलोमीटर अंतर, १४ वर्षापर्यंत मुलांना ३ किलोमीटर अंतर, १७ वर्षापर्यंत मुलींना ३ किलोमीटर, १७ वर्षापर्यंत मुलांना ५ किलोमीटर, महिला खुला गट ५ किलोमीटर, पुरुष खुला गट १० किलोमीटर आणि ४५ वर्षा पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीस ड्रीम रन २ किलोमीटर अशी विभागणी करण्यात आली आहे. विविध गटात पहिल्या सहा येणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षीसासह सन्मानपदक व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि टी शर्ट दिले जाणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी समीर महामूणकर ८०८७८७२३४५, सखाराम कदम ७५०७४०८४७८ आणि तुकाराम चव्हाण ९०२१११२४७४ यांना संपर्क करू शकता.
महाराष्ट्र केसरी २०२३ शिवराज राक्षे यांची माणगांव मध्ये सह्याद्री मॅरेथाॅन स्पर्धेला उपस्थिती खास आकर्षण ठरणार