आलापल्ली येथे भव्य सुर्य नमस्कार कार्यक्रम व क्रीडा ज्ञान परिक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

महेश बुरमवार 

क्रीडा भारती अहेरी तालुका तर्फे रथसप्तमी चे औचित्य साधून भव्य सूर्यनमस्कार व त्याअगोदर घेण्यात आलेल्या क्रीडा ज्ञान परिक्षेचा बक्षीस वितरण समारंभ तालुका क्रीडा संकुल आलापल्ली च्या मैदानावर घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष तथा बक्षीस वितरक म्हणून सौ.शाहिनभाभी हकीम( राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी विदर्भ अध्यक्ष),प्रमुख अतिथी मा.श्री.लक्ष्मणजी येर्रावार(राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष),मा.श्री.शंकरजी मेश्राम(सरपंच ग्रामपंचायत आलापल्ली),मा.सौ.पुष्पाताई अलोणे(सदस्य, ग्रामपंचायत आलापल्ली),मा.श्री.कैलास कोरेत (माजी पंचायत समिती सदस्य),मा. सोमेश्वर रामटेके(सदस्य,ग्रामपंचायत आलापल्ली),मा.श्री .पराग पांढरे(राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष)हे होते.

सर्वप्रथम भारत माता व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर श्री. जय लोनबले सर यांनी सूर्यनमस्कार मंत्राचे पठन करून मैदानात जमलेल्या विद्याथ्र्यांनी बारा सूर्यनमस्कार केले. सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक कु. काजल मडावी हिने करून दाखविले. त्यानंतर क्रीडा ज्ञान परिक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा तिन गटात घेण्यात आली. अ गट (वर्ग 5 वी ते 8वी)यात प्रथम क्रमांक रुतुराज जंगमवार (ग्रीणलँड स्कुल आलापल्ली),दुसरा क्रमांक अनय उरेते(ग्रीणलँड स्कूल आलापल्ली),तिसरा क्रमांक कु.वंशिका सिडाम (राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली),ब गट (वर्ग 9 वी ते 12 वी)यात प्रथम क्रमांक कु सविता मालू आत्राम(राणी राजकुंवर माध्यमिक आश्रम शाळा मोदुमडगु),दुसरा क्रमांक तुषार म्हस्के(ग्रीणलँड स्कूल आलापल्ली),तिसरा क्रमांक रिद्धीश पोट्टेवार (ग्रीणलँड स्कूल आलापल्ली) , क गट (ओपन)यात प्रथम क्रमांक कु.प्राची तोडसाम ,दुसरा क्रमांक पुरुषोत्तम आत्राम, तिसरा क्रमांक सुरज नैताम याने पटकावला.

सदर बक्षीस वितरणासाठी सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर),माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचेकडून 15000/-,श्री.शंकरजी मेश्राम यांचेकडून 6000/- तरश्री. लक्ष्मण येर्रावार यांचेकडून 1000/- रक्कम प्राप्त झाली.तसेच श्री.सोमेश्वर रामटेके यांचे कडून तिन्ही गटात प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला शिल्ड,श्री.जी.महेश सर (मुख्याध्यापक ग्रीणलँड स्कूल आलापल्ली)यांचे कडून तिन्ही गटात दुसरा येणाऱ्या स्पर्धकाला शिल्ड तर श्री.प्रविण बुराण असरअल्ली यांचेकडून तिन्ही गटात तिसरा येणाऱ्या स्पर्धकाला शिल्ड देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पुजा आत्राम, प्रास्ताविक श्री.सुभाष शेंडे सर तर आभार प्रदर्शन कु काजल मडावी हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु शालु केशनवार(अध्यक्ष ,क्रीडा भारती अहेरी तालुका),कु.काजल मडावी(उपाध्यक्ष,क्रीडा भारतीअहेरी तालुका)कु.पुऊजा आत्राम(सचिव, क्रीडा भारती अहेरी तालुका)तसेच कु. युक्ता मारबते, कु.प्रियंका देवकर,कु.कण्या मिरालवार,कु.रोशनी राऊत, कु.सोनी सिडाम,अमोल आत्राम व आशिष बोरुले यांनी सहकार्य केले. सूर्यनमस्कार कार्यक्रमाला ग्रीणलँड स्कूल आलापल्ली, राणी राजकुंवर माध्यमिक आश्रम शाळा मोदुमडगु, ग्लोबल मिडिया स्कूल आलापल्ली, जि.प.मुलांची शाळा आलापल्ली, राजे धर्मराव हायस्कूल आलापल्ली चे विद्यार्थी व शिक्षक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here