पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले…

51

पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले…

✍सचिन पवार ✍

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

रायगड :-खोपोली पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांना प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले. खोपोली पोलीस ठाण्याच्या आणि शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने शिरीष पवार यांना सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या . यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबईमध्ये टिळक नगर पोलीस स्टेशन ,आर्थिक गुन्हे विशेष शाखा, नवी मुंबई एपीएमसी पोलीस स्टेशन, वाशी वाहतूक शाखा, खंडणी विरोधी पथक मोटार वाहन चोरी विरोधी पथक, रबाळे पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. 

नवी मुंबई कार्यरत असताना बँक ऑफ बडोदा, सानपाडा येथे भुयार खोदून चोरी केलेल्या गुन्ह्याचा छडा लावणारे आव्हानात्मक, तसेच आरोपींना मुद्देमालासह अटक करणे, अल्पवयीन मुलींना हेरून त्यांचा विनयभंग व प्र्संगी त्यांच्यावर बलात्कार करणारे असे एकूण 22 गुन्हे करणाऱ्या नराधमांस त्यांनी व त्यांच्या पथकाने अटक केली.

नवी मुंबईत विविध ६० सोनसाखळी चोरी व त्यामध्ये तब्बल २.५ किलो सोने चोरून जबरी गुन्हे केलेल्या आरोपींनी पकडण्याची कारवाई सुरू असताना खालापूर समोरासमोर गोळीबार केला व या चकमकीत आरोपींना जायबंदी करून अटक केली. कळंबोली मध्ये सुधागड एज्युकेशन शाळेसमोरील गेटवर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणातील आरोपींना पकडण्याची प्रशंसनिय कामगिरी केली. या घटनेची दखल घेत पोलीस महासंचालकांनी त्यांच्या टीमला सहा लाखाचे बक्षीस दिले. कामोठे येथील सोन्याचांदीच्या दुकानातून दोन किलो सोन्याची झालेली चोरी, तुर्भे येथील तिहेरी हत्याकांड, वाशी येथील सेक्टर १७ मध्ये कुसूम बिल्डींग येथील दरोड्यातील आरोपींना अटक करण्यासाठी देखील शिरीष पवार यांनी मोठी कामगिरी केली होती. यासारख्या त्यांच्या अनेक कामगिरीची दखल घेत सन २०२० साली मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना सन्मान चिन्ह देवून गौरविले होते.

पोलीस खात्यात प्रदीर्घ सेवा करीत असताना जीवाची बाजी लावत सशस्त्र दरोड्यातील तसेच बलात्कार प्रकरणातील आरोपी पकडून कायद्याचा दबदबा राखला आहे खोपोलीत बदली होऊन आल्यावर ‘शहर सुरक्षित तर नागरिक सुरक्षित’ या ब्रीद वाक्यानुसार खोपोली शहरात कायदा व सुव्यवस्था राखत १००० सीसीटीव्हींचे जाळे उभा केले. सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी शाळांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये व्याख्याने देवून अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला असल्याने पोलिसांच्या कामगिरीसाठी दिला जाणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाने खोपोली चे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी सन्मानित करण्यात आले. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये बार्शी येथे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात यांचा जन्म झाला परंतु स्वकष्टाने चिकाटीने व आपल्या चातुर्य व उच्च बौद्धिक क्षमते च्या बळावर त्यांनी पोलीस खात्यामध्ये स्वतःचं नावलौकिक केले आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावूनही आज ते छोट्याशा शहरात जरी आपली भूमिका बजावत असले तरी खोपोलीमध्ये पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून त्यांनी एकही दिवस शांतचित्ताने ड्युटी केली नाही. रोज त्यांनी स्वतःला आव्हानात्मक कामांमध्ये गुंफून घेतले. शांतता, सुव्यवस्था, गुन्ह्याची उकल, याच बरोबर विविध सामाजिक संस्थेला मार्गदर्शन, शाळांमधून शालेय विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे विषयी माहिती देणे इत्यादी अनेक महत्त्वाची कामे ते रोजच्या रोज करीत संपूर्ण खोपोलीतील नागरिकांना त्यांच्यावर अभिमान वाटत असे परंतु आज या *राष्ट्रपतींचे पोलीस पदक* देऊन त्यांना सन्मानित केल्यामुळे तर खोपोलीतील नागरिकांची मान आणखीनच अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्यावरील खोपोलीकरांचे प्रेम व सद्भाव अफाट वाढले असून अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातून अनेक मान्यवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत असताना दिसून येते.