जालना कापूस उत्पादकांची शासकीय कापूस खरेदीसाठी ओढ.
प्रदिप शिंदे प्रतिनिधी
जालना :- जिल्हातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावासह अनेक गावात शेतकरी कापूस उत्पादकांची शासकीय कापूस खरेदीसाठी ओढ लागली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात कापूस शेतक-यांनी आपल्या शेतता पीकवल उत्पन्न थोड कमी जास्त प्रमाणात झाले, पण आता ते विकण्या करिता शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विकायला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या केंद्र सरकार ने आणलेला नविन शेतकरी कायद्या विरुध्य शेतक-यांन मध्ये जनआक्रोश दिसून येत आहे, सर्व देशातील शेतकरी एकजुट होउन दिल्ली सीमेजवळ केंद्र सरकार विरुध्य आंदोलन करत आहे. तर दुसरी कडे आपल घामानी पीकवलेले पीक शेतकरी बाजारात विक्री करिता नेत आहे.