गोठ्यात बांधलेल्या बैलाला गळफास देऊन केले ठार

59

गोठ्यात बांधलेल्या बैलाला गळफास देऊन केले ठार

पुणे:- पुण्यातील आंबेगाव तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुरवंडी गावात गोठ्यात बांधलेल्या अडीच वर्षाच्या बैलाला अज्ञात व्यक्तीने गळफास देऊन ठार मारले आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यातील शेतकरी संदीप तोत्रे यांनी पंढरपूर येथून खिलार जातीचे दीड वर्षाचे वासरु विकत आणले होते. त्याला चांगला खुराक दिल्याने बैल चांगला तरबेज आणि रुबाबदार दिसत होता. बैलाला अनेकांनी चांगली किंमत देऊन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र संदिप तोत्रे यांनी बैलाची विक्री केली नाही. मात्र बुधवारी रात्रीच्या सुमारास कोणीतरी गोठ्यातील खांबाला रस्सीच्या सहाय्याने बैलाला क्रुरपणे गळफास देऊन ठार मारले आहे. तोत्रे यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. बैलाच्या हत्येनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. संदीप तोत्रे यांनी मंचर पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा नराधम आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.