अलिबाग येथे शनिवारी रायगड प्रेस क्लब पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा

50

अलिबाग येथे शनिवारी रायगड प्रेस क्लब पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

अलिबाग : अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने शनिवारी ( दि.  १८ )  रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही  पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नेहुली – अलिबाग  येथे खेळविण्यात येणार आहे.  या स्पर्धेत  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पत्रकारांचे संघ सहभागी होणार आहेत.

जिल्ह्यातील पत्रकारांची पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा  आयोजित  केले जात असते.  करोना प्रादुर्भावामुळे गेली काही वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदा अलिबाग येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत  सर्व तालुक्यातील पत्रकारांचे संघ सहभागी होणार आहेत. पोलीस विरुद्ध  महसुल विभाग, सर्वपक्षीय राजकीय नेते विरुद्ध अलिबाग पत्रकार असे दोन  प्रदर्शनीय सामने देखील या स्पर्धेनिमित्ताने खेळविले जाणार  आहेत.

स्पर्धेतील विजेता संघ, उपविजेता संघ, तृतीय क्रमांक व  चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या संघांना   भव्य चषक  आणि रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.  या शिवाय शिस्तबध्द संघ, आकर्षक गणवेश यासाठी चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तीक  बक्षीसही दिली जाणार आहेत . प्रत्येक सामन्यातील समानावीरास चषक  बक्षीस देण्यात येणार आहे,  अशी माहीती अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी दिली.