जोगेश्वरीत छत्रपती शिवाजी महाराज व संत शिरोमणी संत रोहिदास महाराज संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

पूनम पाटगावे

जोगेश्वरी प्रतिनिधी

जोगेश्वरी :- रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई रजि. अंतर्गत संजय गांधीनगर स्थानिक पंचायत विभाग समिती क्रमांक ११ जोगेश्वरी (पूर्व) येथे श्री. मोहनजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व संत शिरोमणी संत रोहिदास महाराज संयुक्त जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.

       या सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुण्या सौ.सुरक्षा घोसाळकर, चिटणीस रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज,मुंबई यांनी उपस्थितांना संघटीत होण्यासाठी स्वतः मधील अलौकिक गुणांची ओळख करून कार्य केल्यास आपणही कसा इतिहास घडवू शकता याचे विविध दाखले देऊन प्रोत्साहीत केले.

       रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई चे संघ विश्वस्त श्री.रवीजी पेवेकर, विभागीय अध्यक्ष श्री. गणेशजी शिरीषकर, वधूवर समिती अध्यक्ष शशिकांतजी आंबेकर, उपाध्यक्ष जनार्दनजी आंबोकर, घर बचाव घर बनाओ आंदोलन नेत्या सौ.प्रेरणा गायकवाड, मुंबई झोपडपट्टी महासंघ तालुका अध्यक्ष फुलचंदजी कांबळे, सचिव राजेशजी भालेराव, उत्तर पश्चिम जिल्हा सरचिटणीस रमेशजी पाळदे, सौ.ज्योत्सना वेरूळकर या सर्वांनी महामानवांचे विचार व्यक्त करून समाजाला संबोधित केले. या प्रसंगी जेष्ठ महिलांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्थानिक पंचायतीच्या अध्यक्ष महिला संघटक सौ.सुनंदा गोवळकर,चिटणीस सौ.नेहा देवळेकर विभागीय उपचिटणीस सौ.निशिता नारकर यांनी सहका-यां सोबत महिलांना हळदीकुंकू व भेटवस्तू दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चिटणीस निलेश नारकर यांनी केले.राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणेने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here