को.म.सा.प.शाखा तलातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न…
संतोष मोरे
माणगांव प्रतिनिधी
मो: 7744812027
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळातर्फे महाकवी स्वा.सावरकर स्मृतिदिन व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्याने लक्ष्मी निवास कलानगर,अॕड.परेश जाधव यांचे निवासस्थानी रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वा.*स्नेहबंध भाषेचा…नाळ मराठी मातीशी* हा साहित्यिक कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तळा शाखा संस्थापक,रायगड भुषण पुरुषोत्तम मुळे,उद्घाटक म्हणून मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम,दुर्ग अभ्यासक,रायगड भुषण सुखद राणे,रोहा शाखा अध्यक्षा,कवयित्री संध्या दिवकर,तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के,जिल्हा युवाशक्तीप्रमुख सिध्देश लखमदे आदि.व्यासपिठावर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांचे शुभहस्ते महाकवी स्वा.सावरकर व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन तसेच सरस्वतीपूजन व ग्रंथपूजन करण्यात आले.उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत करुन को.म.सा.प.तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी प्रास्ताविकात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विचार मांडून शाखेच्या उपक्रमांचा उहापोह केला.यावेळी कु.अनुष्का भानुसे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारे अमोघ भाषण केले.या भाषणाने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाल्यानंतर सर्व कवींनी आपल्या कविता,गझला,अभिवाचन सादर केले.
यामध्ये हनुमंत शिंदे,परेश जाधव,रघुनाथ पोवार,प्रधान,श्रेयस रोडे,भाग्यश्री सरकाळे,स्मिता पाबरेकर,सायराबानू चौगूले,संगिता सुरशेट्टे,शिल्पा मोहिते,उल्का माडेकर,संध्या दिवकर,सिध्देश लखमदे,भरत जोशी,बाबुराव कांबळे,वंदन सापळे, संतोष मोरे यांनी कार्यक्रमात रंगत आणली तर मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी सादर केलेल्या नटसम्राटमधील अभिवाचनास सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
शिवव्याख्याते तथा दुर्ग अभ्यासक सुखद राणे यांनी छोटेखानी भाषणात अनुष्काला वक्तृत्वाचे धडे देऊन शिवचरीत्र कसे सादर करावे? याबाबतीत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाबद्दल तळा शाखेला धन्यवाद दिले.अध्यक्षीय मनोगतात पुरुषोत्तम मुळे सपूर्ण कार्यक्रमाचा तसेच कवितांचा आढावा घेऊन यापुढेही तळा शाखा असे साहित्यिक उपक्रम अविरत राबवितच राहील अशी ग्वाही दिली.कवितेचे किंवा साहित्याचे मानवी जीवनामधले अनन्यसाधारण महत्व स्पष्ट करुन त्यांनी प्रत्येकाला लिहिते होण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे छान निवेदन चारोळीकार रणजित गायकवाड यांनी केले.कार्यक्रमास तीस कवी उपस्थित होते.हि साहित्यिक मैफिल यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष हेमंत बारटक्के,उपाध्यक्ष भरत जोशी,सहसचिव उल्का माडेकर,युवाशक्ती प्रतिनिधी श्रेयश रोडे,शिल्पा मोहिते,परमानंद कजबजे यांनी परिश्रम घेतले.