भांडुप येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा २०२३ उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न

74

भांडुप येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा २०२३ उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न

गुणवंत कांबळे,

मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलेपमेंट यांच्या विद्यमाने रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झालेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ६५४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेस मुंबई, महाराष्ट्रासह, राज्याबाहेरून ही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रमुख मार्गदर्शक मा. विशाल वाघमारे, (सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, मुंबई) आणि प्रविणकुमार सर (डायरेक्टर आणि ट्रेनर, प्रविण सर्’स यश एज्युकेशन आणि ट्रेनिंग इंस्टिट्यूट) यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री विद्यामंदीर, भांडूप येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात विशाल वाघमारे सर आणि प्रविणकुमार सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करतअभिवादन केले व तद्नंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून पुढील कार्यक्रमास सुरूवात झाली.

विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिक वितरण सोहळ्याचा आनंद घेत आयोजकांचे कौतुक केले तसेच अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व देशपातळीवर प्लेटफॉर्म राबवण्याची विनंती केली.

मा. विशाल वाघमारे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, मुंबई यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आपल्या पाल्याला आयएएस, आयपीएस बनवण्याचे ध्येय ठेवण्यासाठी प्रेरित केले तसेच विजेत्या स्पर्धेचे अभिनंदन केले. अहमदनगर मधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थीं, पालक व स्पर्धक उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनपर कौतुक केले.

तसेच प्रविणकुमार सरांनी परीक्षाकाळात विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसे सामोरे जायचे तसेच आत्मविश्वास कसा वाढवायचा याबाबत ‘यश फॉर्मयुला’ या विशेष कायक्रमाद्वारे मार्गदर्शन केले. या अगोदरच्या स्पर्धेवेळी ही प्रविणसरांनी खास विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती कार्यशाळेचे मार्गदर्शन केले होते. प्रविणकुमार सर आणि त्यांची टीम ही सात्तत्याने यासाठी काम करत आहे.

अहमदनगर येथून या स्पर्धेस विशेष सहभाग ज्यामुळे मिळतो ते अक्षरमित्र सुभाष एच् शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत स्पर्धेबाबत लॉकडाऊन काळात शाळा बंद, अभ्यास बंद असताना या काळात स्वत:सह विद्यार्थ्यांना मोटीवेट करत टीआयएसडी वतीने राबविण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभाग नोंदवला तसेच तेव्हापासून आजपर्यत अहमदनगर येथील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच संविधानांच्या उद्दिष्टांप्रति जनजागृती व्हावी या उद्देशाने टीआयएसडी जे काम करत आहे त्याबाबत आणि तसेच स्पर्धकांसोबत ऑनलाईन स्पर्धेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत करत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी टीआययसडी टीम चे विशेष कौतुक केले.

सदर कार्यक्रमात सागर तायडे, लव क्षीरसागर यांनी देखील विशेष कौतुक करत उपस्थिती दर्शविली.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे, तसेच स्थानिक कार्यकर्ते, संविधानप्रेमी, नागरिक व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंटच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

तसेच प्रदीप खंकाळ अल्पोपहार दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

….……………………………………………

निकाल(Result)

 

पहिला गट ( ३री ते ६ वी)

 

🥇प्रथम क्रमांक🥇: अर्जुन हर्षद चव्हाण., श्रीरामपूर

🥈द्वितीय क्रमांक 🥈: अस्मिता नवनाथ पुंड, अहमदनगर

🥉तृतीय क्रमांक🥉 : प्राची संजय नवगिरे भांडुप

 

उत्तेजनार्थ पहिला गट:

 

▶ संस्कार अमोल देवकर, भांडुप

▶ गौरव सचिन माळवदे, अहमदनगर

▶ श्रेया सचिन नलवडे, भांडुप

▶ स्वरा सोन्याबापू मुदळ, अहमदनगर

▶ प्रसाद बापू खंडागळे, अहमदनगर

▶ रोनिक विजय सावळे, भांडुप

▶ काव्यांजली शिवाजी लोणकर, फलटण

 

दुसरा गट ( ७वी ते १०वी)

 

🥇प्रथम क्रमांक🥇: साक्षी सचिन वीर,भांडुप

🥈द्वितीय क्रमांक 🥈: विराज राहूल माळवदे,अहमदनगर

🥉तृतीय क्रमांक🥉 : प्रणय पवनकुमार डवंगे,भांडुप

 

 

उत्तेजनार्थ दुसरा गट:

 

▶ रिद्धी प्रल्हाद सावंत,भांडुप

▶ प्राजक्ता संजय घाडगे,भांडुप

▶ प्राची विरेद्र् चौरसिया,मुंबई

▶ वैष्णवी बाबासाहेब खकाळ,अहमदनगर

▶ अंतिमा रामूजागीर गौतम,कुर्ला

▶ ओमकार मानकामे,रायगड

▶ प्रसाद गोरख गहिले,अहमदनगर

▶ साक्षी रामभाऊ पायघन,भांडुप

▶ शोभना सुरेश घोडगे,पवई

▶ प्रिया सोनावणे

▶ साक्षी विलास गवस,चुनाभट्टी

 

 

खुला गट :

 

🥇प्रथम क्रमांक🥇: दिपक कृष्णा आंगलेकर,नवी मुंबई

🥈द्वितीय क्रमांक 🥈: निशा श्रीपाल जाधव,रत्नागिरी

🥉तृतीय क्रमांक🥉 : सुचेता सुरेंद्र पवार,पालघर

 

उत्तेजनार्थ खुला गट:

▶अमित राहुल दुबे,चंद्रपूर

▶भाग्यश्री तेज चंद,पूणे

▶आश्विनी सर्जेराव घुगे,उस्मानाबाद

▶किशोर अरूण भालेराव,पूणे

▶प्रदीप साहेबराव भिसे,पालघर

▶रंजना शशिकांत बागुल.,मुलुंड

▶रुपेश रामदास केळकर.,मालाड

▶विकास नांदिवडेकर,नवी मुंबई

▶वैष्णवी विलास माटल,नवी मुंबई

▶दुर्गादेवी दत्तात्रय सरगर,सांगली

▶भविता भास्कर कदम.,रत्नागिरी

▶अविराज यशवंत गोरिवले,मालाड

▶सुभाष एच् शिंदे,अहमदनगर

▶सोनाली वल्लभ तापकीर,पूणे

▶पायल संजय जागडे,विक्रोळी

▶थोरात जयश्री अशोक,अहमदनगर

▶विशाल शशिकांत गायकवाड,चेंबूर

▶सिद्धार्थ खंडू गायकवाड,ठाणे

▶श्रुतिका शामराव पवार,रत्नागिरी

▶शुभांगी आनंद भोसले,

▶अमेय रविंद्र पडेलकर,बोरिवली