शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवून केलं ब्लॅकमेल

राजस्थान:- शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना राजस्थानच्या बूंदी येथे घडली आहे. येथील एका शिक्षकाने आपल्या नववीच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचं वृत्त आहे.

या शिक्षकाचं नाव धर्मराज मीणा असं आहे. तो इयत्ता तिसरीचा शिक्षक आहे. पीडिता त्याच्याच शाळेत शिकणारी नववीची विद्यार्थिनी आहे. धर्मराज या मुलीला सतत धमकावत होता. त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तो तिला वारंवार वेगवेगळ्या बहाण्याने शाळेत बोलवत असे आणि तिच्यावर बलात्कार करत असे.

त्याने तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केला. तसंच त्याने तिला दुसऱ्या गावात नेऊन तिथेही त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ बनवला आणि त्या द्वारे तिला ब्लॅकमेल करू लागला.

मुलीने अखेर तिच्या घरच्यांना या गोष्टीची कल्पना दिली. तिच्या कुटुंबाने पोलिसांमध्ये तक्रार केली असून धर्मराज तेव्हापासून फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here