शीर्षक – जिवंत अपेक्षांची अंतयात्रा…!

54

शीर्षक: – जिवंत अपेक्षांची अंतयात्रा…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

   या, पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस, मुके प्राणी, जीवजंतू, झाडे, झुडपे जन्माला येतात आणि एक दिवस ह्या जगाचा निरोप घेतात हा निसर्गाचा नियमच आहे तो आजपर्यंत कोणालाही चुकला नाही आणि कधीच चुकणारही नाही कारण, निसर्ग जिकडे, तिकडे पसरलेला आहे तो सर्वाकडेच बघत असतो. म्हणून त्याची बरोबरी करण्याच्या भानगडीत आपण पडू नये होऊ शकेल तर त्याच्या नियमांचे पालन करायला शिकले पाहिजे तेही आपल्यावर अवलंबून आहे जसे पालन केले तसे सुखही भोगता येईल न पालन केल्यास दु:खाच्या पक्तीत बसण्याची आपोआप वेळ येईल त्याबाबतीत फक्त आपणच ठरवावे.

असो, आजच्या लेखाचा शीर्षक वाचून आपल्याला वेगळेपणा जाणवला असेल साहाजिकच आहे. माणूस म्हटल्यावर प्रत्येक माणसाला काही ना काही लहान, मोठ्या अपेक्षा असतात पण म्हणतात ना की, जास्त अपेक्षा करू नये दु:खाचे कारण आपण स्वतः च बणत असतो हे सर्व ठीक आहे पण, याच समाजामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जास्त मोठ्या नाही पण, थोड्या लहान अपेक्षा असतील ..त्या अपेक्षा पूर्ण व्हायला नकोत का. .? पण, तसं काहीही होताना दिसून येत नाही कारण, आताच्या सध्याच्या परिस्थितीत बघितले तर.. बदलेले चित्र सर्वत्र दिसत आहेत जसे, गोरगरीबांच्या अपेक्षा, बळीराजाच्या अपेक्षा, विधवा भगिणीच्या अपेक्षा , भटक्या जमातीच्या अपेक्षा , दिव्यांग बांधवांच्या अपेक्षा , ज्या गावात आजपर्यंत कधीच एसटी बस गेली नाही त्या,गावकरी लोकांच्या अपेक्षा, रस्त्यावर पडलेले मोठे,मोठे खड्डे पाहून थकलेल्या लोकांच्या अपेक्षा, आदिवासी च्या अपेक्षा, ज्या गावात विद्यार्थासाठी धड शाळा नाही अशा शाळेकरी विद्यार्थाच्या अपेक्षा,, काही ठिकाणी पाण्यासाठी कोसोदूर जाऊन पाणी आणावे लागते अती दुष्काळ कधी संपेल ही अपेक्षा , काही ठिकाणी आरोग्यासाठी वेळेवर सुविधा पोहचत नाही ही कधी सोय लाभणार ही अपेक्षाा…

कुठे मोबाईलचा टावर उभा आहे पण, रेंजच राहत नाही ही अपेक्षा, काही ठिकाणी नदी, नाल्यावर अजूनही पुल बांधलेले नाहीत त्याची अपेक्षा, एक भारी समस्या, कुठे हाताला रोजगार नाही उपासमार सहन करावी लागते कधी पूर्ण होणार ही अपेक्षा, , एवढेच नाही तर..काही गावात विजेचा लपंडाव असतो वीजपुरवठा मिळावी ही अपेक्षा अशा कितीतरी अपेक्षा सर्व सामान्य लोकांच्या मनात निर्माण झालेल्या आहेत.

      पण, शोकांतिकाच म्हणावे लागेल की, त्यांच्याकडे कोणीही काळजीपूर्वक लक्ष देत नाही त्यामुळे त्यांच्या अपेक्षांची जिवंतपणीच अंतयात्रा निघत आहे. आम्ही म्हणत असतो की, हे सर्व त्यांच्या वाट्याला आलेले भोग आहेत पण तसं काहीही नाही त्यांना जाणून बुजून दूर लोटल्या जात आहे हे वास्तव सत्य आहे. 

त्याच प्रमाणे याच समाजामध्ये राहणाऱ्या लोकांकडे गाडी, बंगला, अफाट धनसंपत्ती, पैसा असताना सुद्धा पुन्हा आपल्याला अजून काहीतरी मिळावं अशी अपेक्षा ठेवून आवाज उठवतात आणि वेळ आपल्यावर लगेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात. हे,असे,कसे एवढ्या झपाट्याने होवू शकते. .? पण, ह्या समाजात राहणाऱ्या इतर लोकांच्या अपेक्षांचे काय. .? त्यांच्या अपेक्षा कधी पूर्ण होतील. .? का म्हणून त्यांच्या अपेक्षांची अंतयात्रा निघत असते..? का म्हणून शासनाला त्यांचे हाल, अपेष्टा का म्हणून दिसत नाही. .? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मुखातून बाहेर पडताना दिसत आहेत. आज बघितले तर..बळीराजाच्या जीवनात आनंद कमी पण अडचणी पक्तीत बसल्यासारखे दिसून येत आहेत त्याचे जगणे हिरावून घेतलेले आहेत पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याच्या पिकाला भाव मिळत नाही, दुसरी गोष्ट म्हणजेच यावर्षी त्याच्या शेतातील पांढरे सोने चांगल्याप्रकारे बहरून निघाले आहेत पण, रस्त्याच्या धुळीमुळे त्या पांढऱ्याशुभ्र सोन्याचा रंग बदलून गेलेला आहे इथे बळीराजाचा काय दोष. .? एकीकडे पीक वाचविण्यासाठी ,पाण्यासाठी त्याला आंदोलन करावे लागते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. तो,जगाचा पोशिंदा आहे कोणाचा नौकर, चाकर, गुलाम नाही आणि त्याला गुलाम बणविण्याची कोणातही ताकद नाही, त्याला कोणीही जिंकू शकत नाही पण, प्रश्न हा आहे की, त्याला कोणीही मदत करत नाही. 

      त्यामुळे आज तो,गळफासात अडकत आहे ह्याला जबाबदार कोण. ..? जरा विचार करा जिवंतपणी त्याच्याही काही अपेक्षा असतील, त्यालाही इतरांसारखे जगायचे असेल ह्या विषयी कोणी बोलावे..? तुम्ही येशी मध्ये राहून आनंदाने जगा पण, त्यालाही सुखाने जगू द्या. त्याच प्रमाणे बळीराजासारखे या समाजात असे कितीतरी रंजले, गांजले लोक आहेत त्यांचा कोणीही वाली दिसत नाही त्यांच्याही काही अपेक्षा असतील त्याही पूर्ण होत नाही कारण आजचा जमाना सत्याचा नाही तर..खोट्याचा आहे ज्यांच्याकडून खायला भेटते त्यांच्याकडे धाव घेतात व त्यांनाच जोमाने साथ देतात, ज्यांच्याकडे काहीच नसते त्याला कोणीही विचारत नाही. म्हणूनच याच समाजात राहणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या अपेक्षांची जिवंतपणीच अंतयात्रा निघत आहे, वास्तव सत्य आहे आपण नाकारू शकत नाही.या पृथ्वीतलावर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे पण,सर्व सामान्य लोकांच्या मनातील अपेक्षा काही वाचाळवीर,प्रस्तापित लोकांमुळे पूर्ण होत नसतील तर त्यांनी कोणाकडे धाव घ्यावी. .?या विषयी शासनाने एकदा तरी विचार करून बघायला पाहिजे कारण या भारतभूमीमध्ये जेवढे लोक जन्माला आलेले आहेत ते सर्व लेकरे भारत मातेचे व होऊन गेलेल्या सर्व महा विभूतींचे लेकरे आहेत हे विसरता कामा नये.