स्पॉटलाईट: परंपरा की भाकडकथा 

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

 आज विज्ञानयुग आहे. अशा विज्ञानयुगात अंधश्रद्धेला थारा नाही. काल चंद्र सुर्याला देव मानणारा माणूस आज त्याला चंद्र सुर्य म्हणजे काय हे समजायला लागलं आहे. अशातच काही काही अंधश्रद्धा कालबाह्य ठरत चालल्या आहेत. 

         अंधश्रद्धेचा विषय मांडतांना एका दुकानाची गोष्ट सांगतो. एका दुकानात गोष्टी चालल्या होत्या. त्या अंधश्रद्धेच्याच गोष्टी होत्या. दुकानदार ग्राहकाला त्याच्या दुकानात विक्रीला असलेल्या धूपबत्तीचं महत्व पटवून देत होता. म्हणत होता की आपण धूपबत्तीच घ्यायला हवी. कारण देवाला धूपडत्तीच चालतं. 

         धूपबत्ती…….या धुपबत्तीवरुन संवाद. सवांदात आठवतं की ज्या वस्तू मृत माणसांशी संबंध ठेवतात. अशा वस्तू आपण देवासाठी वापरु नयेत. जसे वेळू कधीच मृत माणसांच्या शरणावर जाळला जात नाही. (अपवाद आज त्यालाही जाळतात.) म्हणून वेळूची काडी टाकून बनवलेली अगरबत्ती आपण देवघरात जाळता कामा नये. तसं पाहता वेळूचं झाड वंशवृद्धीचं प्रतिक आहे. 

          कदाचीत वरील म्हणणं बरोबर असू शकते. कारण वेळूच्या झाडाला आपण जर पाहिलं असेल तर ते झाड पसरत असतं. खाली जमिनीपासूनच ते झाड पसरत जातं. म्हणूनच त्याला जाळू नये हा संदर्भ. 

          अंधश्रद्धेच्याबद्दल सांगताना व त्याचा मृत आत्म्याशी संबंध जोडतांना काही अंधश्रद्धा सांगतो. रात्र झाली की दुकानातून सुई किंवा टोकदार वस्तू विकता येत नाही. कारण असा समज आहे की या सुईनं किंवा टोकदार वस्तूनं मृत माणसाचं शरीर शिवलं जातं. तसंच मृत शरीराचं रात्री शवविच्छेदन करता येत नाही. कारण असं दिलं जातं की रात्री मृत शरीरातील आत्म्ये सक्रीय होतात. रात्री कुंकूही विकता येत नाही. कारण कुंकू हे सौभाग्याचं लक्षण समजलं जातं. रात्री कुंकू विकणं म्हणजे सौभाग्य विकणं होय असं मानण्यात येतं. तरीही आज परिस्थिती अशी आहे की ब-याचशा जत्रेच्या ठिकाणी कुंकू रात्रीला विकतात. कारण तो विकणं हा व्यवसाय आहे. तो विकल्याशिवाय पर्याय नाही. 

         अशा ब-याच अंधश्रद्धा आहेत. जसं हळद विकता येत नाही. तिही सौभाग्याचं लक्षण आहे. परंतू आज ती एक खाण्याचा पदार्थ असल्यानं लोकं हळदीला विकतातच.

          महत्वाचं म्हणजे असल्या अंधश्रद्धा. खरं तर या अंधश्रद्धांना लोकांनी तिलांजली द्यायला हवी आजच्या विज्ञानयुगात. कारण आपलीच कामं अडत असतात. जशी मांजर वा कुत्रा आडवा गेल्यास एखादा व्यक्ती तो जाण्याचा रस्ता कोणी पार करेपर्यंत आपण आजही रस्ता पार करीत नाही. त्यामुळ आपल्याला जिथं कुठं महत्वाच्या ठिकाणी जायचं असेल तर तिथं जाता येत नाही. प्रसंगी आपल्याला आपल्या अशा वागण्यानं बोलणं खावं लागते. 

           आजही काही अंधश्रद्धा लाभाच्या मानल्या जातात तर काही अंधश्रद्धा ह्या नुकसानदायक मानल्या जातात. साप दिसणे अशुभ व मुंगूस दिसणे शुभ मानलं जातं. कोणी घुबड दिसण्याला शुभ तर कोणी अशुभ मानतात. अमूक अमूक तोटके केल्यानं लक्ष्मी येते असंही प्रसवलं जातं. खरंच या असल्या अंधश्रद्धा पाळल्यानं लक्ष्मी जर आली असती तर सर्वच लोकं करोडपती बनले असते. कोणीही गरीब उरले नसते. 

         विशेष सांगायचं म्हणजे या असल्या अंधश्रद्धा……या अंधश्रद्धांना परंपरा म्हणाव्या की भाकडकथा? या अंधश्रद्धा पाळाव्या की पाळू नये? या अंधश्रद्धा पाळल्यानं खरंच फायदा होतो की नुकसान होतं? आदि अनेक प्रश्न आहेत. ये अंधश्रद्धा पाळल्यानं जर फायदा होत असेल तर,अवश्य पाळाव्या. अन्यथा आजच्या विज्ञानयुगात त्या पाळण्याची गरज नाही. तरीही लोकं त्या पाळत असतात त्याचं आश्चर्य वाटतं. 

           महत्वपुर्ण गोष्ट ही की अंधश्रद्धा ह्या माणसाला अंधारात नेवून टाकतात. त्यातच आपला विकास खुंटवतात. आज विज्ञानयुग आहे. विज्ञानानं सारंच सिद्ध केलं. आज आपल्याला ओळखता येतं सत्य असत्य. देव दानवाची प्रतिकृती आपल्याला ओळखता येते व आजच्या काळात कोण कोणाला कोणत्या अंधश्रद्धा प्रसवून मुर्ख बनवतो तेही ओळखता येतं. म्हणून त्या पाळू नयेत व कोणाच्याही मायाजाळात जावू नये. जेणेकरुन आपण फसू व त्यातून निघू शकणार नाही. विशेष सांगायचं म्हणजे अंधश्रद्धा ह्या परंपरा नाहीत तर,त्या भाकडकथाच आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here