मुंबई येथे १५ मार्चला ओबीसी समाजाचे निदर्शने आंदोलन व राज्यव्यापी अधिवेशन, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आयोजन

ओबीसी समाजाने सहभागी होण्याचे आवाहन : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,5 मार्च: ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मुंबईला निदर्शने आंदोलन व राज्य अधिवेशन घेण्यात येत आहे. हे निदर्शने आंदोलन हे येत्या १५ मार्च रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधित होणार आहे व दुपारी २ नंतर राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित होणार आहे.

या निदर्शने आंदोलन व अधिवेशनानिमित्ताने लक्षवेधी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावे, याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सोबतच सर्व मागण्या सविस्तर चर्चा करण्याकरीता महासंघाच्या पदाधिका-यांना चर्चा करण्याकरीता तारीख व वेळ देण्याची विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलन व अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.

या आंदोलन व अधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे. यामधे प्रामुख्याने बिहार राज्यात ज्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन जात निहाय जनगणना करण्यात येत आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुद्धा ओबीसी प्रवर्गाची जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करावी, महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचान्यांकरिता जुनी पेंशन योजना त्वरित लागू करण्यात यावी, मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये, महाराष्ट्र शासनाने थांबविलेली मेगा नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, ओबीसी कर्मचान्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यात यावे, ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरू करण्यात यावी, ओबीसी, विजाभज व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे, एस.सी.,एस.टी. विद्यार्थ्यांना लागू असलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सर्व ओबीसी, विजाभज व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावी. ओबीसी विजाभज व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात व तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची राज्यामध्ये अमलबजावणी कार्यक्रमांतर्गत ओबीसींचा विजाभज व विशेष मागास प्रवर्ग समावेश करण्यात यावा, म्हाडा व सिडको मार्फत बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी, विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग संवर्गासाठी आरक्षण लागू करण्यात यावे, ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक अभ्यासक्रम स्कॉलरशिप व फ्रीशिप योजनेकरिता सामाविष्ट करण्याबाबत, गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ५० विद्यार्थ्यांची संख्या वाढवून १०० विद्यार्थी करण्यात यावी. या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती करीत असताना सेवा वादीत नसलेल्या ओबीसीतील कर्माले जाते. हा अन्याय दूर करण्यात यावा व सेवाज्येष्ठतेनुसार ओबीसी कर्मचा प्रवर्गातून पदोन्नती देण्यात यावी, आदी जवळपास ३१ मागण्यांचा समावेश आहे.

या निदर्शने आंदोलन व अधिवेशनाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, डॉ. प्रकाश भांगरथ, चेतन शिंदे, शाम लेडे, सुषमा भड, शेषराव येलेकर, एड. रेखा बाराहाते, डॉ. सुधाकर जाधवर, गुनेश्वर आरीकर, शरद वानखेडे, एड. पुरुषोत्तम पाटील, ऋषभ राऊत, आदी तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here