गौण खनिज संपत्तीचे अवैध उत्खनन शासन कुंभकर्णी झोपेत.

भर दिवसा गौण खनिज संपत्तीची लूट सुरु असुन. परंतु महसूल विभागाचे अधिकारी आणी पदाधिकारी हे लूट होत असल्याचे प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी पाहत असतांना सुद्धा त्याकडे डोळेझाकपणा करत आहेत. संबधित ग्रामपंचायत सरपंच आणी ग्रामपंचायतचे सचिव व तलाठी यांना याबाबत माहिती विचारली असता ऊडवा ऊडवीची उत्तरे देत आहेत.

युवराज मेश्राम प्रतिनिधी
कळमेश्वर:- तालूक्यातील सावनेर महसूल विभागात येणा-या मौजा पटकाखेडी, कोठेडी, तोंडाखैरी, आदासा, सोनपुर, बोरगावं (धु) येथील महसूल विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या बरडावरील फरांडा (दगड) महसूल विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे गौण खनिज संपत्तीची फार मोठ्या प्रमाणात लूट होत असुन त्यामूळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचे समोर येत आहे.

भर दिवसा गौण खनिज संपत्तीची लूट सुरु असुन. परंतु महसूल विभागाचे अधिकारी आणी पदाधिकारी हे लूट होत असल्याचे प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी पाहत असतांना सुद्धा त्याकडे डोळेझाकपणा करत आहेत. संबधित ग्रामपंचायत सरपंच आणी ग्रामपंचायतचे सचिव व तलाठी यांना याबाबत माहिती विचारली असता ऊडवा ऊडवीची उत्तरे देत आहेत. यावरुन असे लक्षात येत आहे की या प्रकरणात काही तरी आर्थिक हित संबध आहे.

बरडावरील दगड काढण्याचे काम करणा-या मजुरांना विचारले असता आम्ही मजुरीने काम करीत असल्याचे सांगण्यात आले. यामागे काही गौण खनिज संपत्तीची चोरी करणारे खनिज तस्कर दलालांची साखळी असल्याचे लक्षात येते. उत्खनन करून काढलेल्या फरांड दगडाची किंमत प्रती नग बारा रुपये याप्रमाणे घेतल्या जात आहे. आणी त्याला व्यवस्थीत काटकोनात छिलुन तयार केलेला फरांड दगडाची किंमत प्रती नग अठरा ते वीस रुपये प्रमाणे विकले जात असल्याचे येथील मजुरांचे म्हणने आहे. शेकडा दोन हजार रुपये प्रमाणे विकला जात आहे. या जागेवरुन आजपर्यंत गौण खनिज तस्करांनी लाखो दगड कोट्यावधी रुपयांला विकला गेला. यांचा आज पर्यंत अंदाज लागलेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाचा गौण खनिज महसूल लुटल्या जात असतांना शासन आणी प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे कि झोपेचे सोंग घेऊन झोपलेले आहे. या क्षेत्रातील बरडावरील फरांडयाच्या दगडांची फार मोठा प्रमाणात मागणी असुन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यात दलाल आणी तस्करा मार्फत मोठी किमंत घेऊन हा फरांडा दगड विकल्या जात आहे.

या प्रकरणी गौण खनिज संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून यात कसूर करणा-या संबंधित अधिका-यांवर आणी कर्मचा-यांवर करवाई करुन शासनाचा बुडवित असलेला महसूल यांचाकडुन वसूल करण्यात यावा अशी मागणी समस्त गावक-यांनी व तालूक्यातील जनतेनी केली आहे. या प्रकरणी शासन आणि प्रशासन काय करवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here