सावित्रीमाई फुले नगरात बौद्ध तत्वज्ञान व संगोष्टी कार्यक्रम उत्साहात

राजेन्द्र मेश्राम 

गोंदिया शहर प्रतिनिधी

मो: 9420513193

गोंदिया ता 7:- येथील कुंभारे नगर जवळील सावित्रीमाई फुले नगरातील बुद्धसुर्य बौद्ध विहारात फाल्गुण पौर्णिमेनिमित्त बौद्ध तत्वज्ञानावर आधारित संगोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी मोठया प्रमाणात उपस्थित उपाषक महिला भगिनींनी आपले विचार मांडले.

या माध्यमातून सविता ताई उके यांनी आपल्या उदबोधनातून सांगितलं कि,

एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराचा मंत्र दिला असतांना, अन्य सण त्योहारात आपले अमूल्य वेळ आणि पैसा आम्ही खर्च घालवीत आहोत परिणामी पुढील काळ खूपच संघर्षमय राहणार आहे, याची जाणीव ठेवून असे संगोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असे विचार मांडले.

यावेळी बोलताना आयु, संध्याताई बंसोड केन्द्रिय शिक्षिका भा.बौद्ध. महा.यांनी त्रिशरण पंचशीलाचे महत्व पटवून दिले. तर वैशाली खोब्रागडे आणि समता गणवीर यांनी होळी, दिवाळी,दसरा, आणि रक्षाबंधन आदि सण त्योहार हे बौद्ध धम्माशी कसे विपरीत विचारधारेचे आहेत हे समजावून सांगितले. तर कोकिळा राहुलकर यांनी बौद्ध सणांची माहिती देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, वैशाख पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हे सण बौद्धानी साजरे करावे अशी विनंती केली. ऍड एकता गणवीर यांनी बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यावर भर दिला. तर पृथ्वीराज कोल्हटकर यांनी फाल्गुण पौर्णिमा आणि त्या संबंधित 4 महत्वाच्या घटना यावर विचार मांडले.

सर्वच उपाषक शुभ्र वस्त्र परिधान करून शामिल झाले. बुद्धवंदनेने संगोष्टी कार्यक्रमाची सुरुवात झाली. तक्षशिला गडपायले यांच्या वाढदिवसा निमित्त यावेळी केक वितरण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सेवट सामुदायिक सरनत्या नी संपन्न करण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here