आरे परिसरातील प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांचे जीवनमान धोक्यात

पूनम पाटगावे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- आरे कॉलनी म्हंटले की आठवते तो निसर्गरम्य परिसर. याच परिसरात नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबरच प्राणीमात्राचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. आरे परिसरात परंतु प्लास्टिक बंदीचे तीनतेरा वाजलेले दिसत आहेत. यामुळे आरे परिसरातील मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय असे आपणाला पाहायला मिळतेय.

         मुंबईत ठिकठिकाणी उकिरड्यावर किंवा कचरा गोळा होतो त्याठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या लाखोंच्या संख्येत पाहायला मिळतात. टाकाऊ खाद्यपदार्थ अश्या पातळ झबला प्लास्टिकच्या पिशवीत भरून कचऱ्यात टाकलेले असतात आणि हे खाण्यासाठी त्याठिकाणी भटकी कुत्री, गाई, कावळे इत्यादी प्राणी येतात. या जमा होणाऱ्या कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्यातील अन्नपदार्थ खाता खाता प्लास्टिक पण त्यांच्या पोटात जाऊन मूक जनवरांच्या जीविताला धोका निर्माण होतोय आणि यात कित्येक प्राण्यांनी आपला जीव गमावल्याचे देखील यापूर्वी आपण पहिले आहे. ठाकरे सरकारच्या काळातील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पातळ प्लास्टिक पिशव्यावर बंदी आणून पुष्कळ प्रमाणात प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणले होते. परंतु सध्यस्थितीत राज्यसरकारने यावरील बंदी उठवल्याने पुनः प्लास्टिकचा वापर मोठया प्रमाणात वाढलेला दिसून येतोय.

       राज्यसरकारने याबाबत पुनः विचार करून प्लास्टिक बंदी अंमलात आणली पाहिजे. त्यामुळे मुक्या प्राणीमात्राचे जीव तर वाचतीलच सोबत पर्यावरण प्रदूषणही वाढणार नाही व जागोजागी लागणारे कचऱ्याचे ढिगारे कमी प्रमाणात दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here