शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प : आमदार अडबाले

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 9 मार्च: राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर आणि शिक्षण क्षेत्रावर कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. शाळेत येणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता म्हणून केवळ एक रुपया दिला जातो. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. मृत किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांसंदर्भात जुनी पेन्शन लागू करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.

ग्रामीण भागात पांदण रस्त्यांसाठी सुद्धा तरतूद केलेली नाही. मागील २० वर्षांपासून विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देण्याच्या प्रश्नाबाबतही कोणतीच तरतूद केली नसल्याची प्रतिक्रिया आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here