छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी  

51

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी  

सुनिल पवार 

मीडियावार्ता 

दिनांक 10 मार्च रोजी पिंजर येते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली त्या नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

गावातील सर्व नागरिकांनी मराठमोळ्या पोशाखात मोठया जल्लोशात बँड वाजवत शिवजयंती साजरी केली. गावातील जाणत्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता या विषयावर बोलून उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले.