जोगेश्वरीत श्री कालिमाता उत्सव समितीद्वारे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी
पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी
जोगेश्वरी :- जोगेश्वरी पूर्वेकडील संजय गांधी नगर येथील श्री कालिमाता एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था व श्री कालिमाता उत्सव समिती यांच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. या मंडळामार्फत सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सायंकाळी ७ नंतर शिवरायांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यनृत्य सादर करून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकचे खास आकर्षण म्हणजे मिरकणुकीत सहभागी झालेले बालशिवराय व त्याचे मावळे. मिरवणूकीदरम्यान बालकलाकारांनी वेशभूषा परिधान करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्याला फेटे बांधून लेझीम नृत्य केले. त्यानंतर मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त बालकलाकारांनी शिवरायांवर आधारित नृत्याविष्कार सादर केला आणि महिलांनी महाराष्ट्र गीत गायिले.
शिवजयंतीनिमित्त सदर कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे बालशीवशाहीर म्हणून सर्वत्र ख्याती असलेले आदिराज सतीश सुर्वे. अवघ्या वयाच्या १० व्या वर्षात असणाऱ्या आदिराज यांनी शिवरायांवर आधारित पोवाडा सादरिकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आदिराज यांच्या पोवाड्यामुळे परिसरातील वातावरण शिवमय झाले. इतक्या लहान वयात आदिराज ने आपली शिवराय कला जोपासत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे