शासकीय कार्यालयात शुकशुकाट, जुन्या पेन्शनसाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव : जुनी पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आक्रमक झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल,पेण,मरूड-जंजिरा ,अलिबाग, रोहा,माणगांव, महाड, श्रीवर्धन आदी भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी कर्मचाऱ्याकडून काळी फीत बांधून आंदोलने देखील करण्यात आली आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करणे अन्य मागण्यासाठी राज्यभरातील लाखो शासकी्य कर्मचारी मंगळवारपासून राज्यव्यापी संपावर गेले आहेत. या संपाचे पडसाद रायगड जिल्ह्यातही उमटत आहेत. माणगांव बालाजी कॉम्प्लेक्स पासून बाजारपेठ, कचेरी रोड येथून मोर्चा काढत माणगांव मध्यवर्ती प्रशासकीय भवन (तहसील कार्यालय) समोर शेकडो कर्मचाऱ्यांनी जोरदार निर्दशने करत “आमचा आता एकच नारा, जुनी पेन्शन लागू करा “असे फलक झळकत मागणी केली. तसेच शालेय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामसेवक, समन्वयक, सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यासह कत्राटी कर्मचारीही या आंदोलनातं सहभागी होते. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत संप करण्याचा इशारा देत निवेदन देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्व्यक समितीने नवीन पेन्शन योजना रद्द करून १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मंगळवारी १४ मार्च पासून बेमुदतं राज्यव्यापी संप स्वीकारलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here