टीसीबीटी जैविक शेती तंत्रज्ञान नियोजन आणि आढावा बैठक
अभिजीत ध. बेहते (कृषी अभियंता)
मो: 8669187867
दि.१५ मार्च २०२३ ला चिमूर येथे टी सी बी टी जैविक शेती तंत्रज्ञान येत्या खरीफ हंगामासाठी नियोजन आणि आढावा बैठक घेण्यात आली. यात शेतीविषयक अनेक मुद्दे मांडण्यात आले त्यात रासायनिक मुक्त शेती,तालुक्यात जैविक शेती याला प्राधान्य देणे तसेच याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली या सभेचे सूत्रसंचालन मा. अनिलजी मेहेर सर यांनी केलेत तसेच टी सी बी टी जैविक शेती तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले तसेच श्री.बनसोड सर यांनी आपला टी सी बी टी नैसर्गिक शेती विषयक स्वतःचे अनुभव सांगितले,श्री. रमेशजि चूटे यांनी फसल गुट्टी व सिंचन पद्धती विषयक मार्गदर्शन केलेत.
या सभेला तालुक्यातील शेतकरी मा.किशोरजी शिंगरे,मंगेश शिरभये,विजयजी डुकरे,निलेश कोसे, हेमंतजी पिसे,पांडुरंग शेंडे, कारवटकर सर,श्री.शरदजी थूटे,गणेश गावंडे,रमेश चूटे,सुरेशजी लाखे ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी चिमूर चे संचालक आ.कु.अभिजीत बेहते व इतर मान्यवर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.एकंदरीत सभा सकारात्मक पार पडली.
शेवटी सभेचे आभार प्रदर्शन ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी चे प्रकल्प समन्वयक श्री.प्रफुल मदनकर यांनी केले आणि सभेला निरोप देण्यात आला.