भिवंडीत कापडाच्या गोदामाला भीषण आग.

63

भिवंडीत कापडाच्या गोदामाला भीषण आग.

भिवंडीमध्ये कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. सध्या सात वाजेच्या सुमारास ही आग लागली. मात्र अद्याप आगीय नियंत्रण मिळालेलं नाही. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भिवंडी:- मध्ये गोदामाला आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी सायंकाळी दापोडा गाव, वडगावातील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील एफ/5 बी-2 या कापडाच्या गोदामाला लागलेली भीषण आग अद्याप विझली नाही. गोदामाच्या 200 फुटापर्यंतच्या परिसरात ही आग असून तीन अग्निशमन बंबासह एक जंम्बो पाण्याचा टँकर तसेच खाजगी पाण्याचे टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उल्हासनगर, कल्याण – डोंबिवली, ठाणे येथूनही अधिक कुमक मागवण्यात आली आहे. अद्याप या आगीमध्ये कोणीही जखमी नाही. दरम्यान, भिवंडीमध्ये आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असून हे प्रकार थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.