19 मार्च…चला एक दिवसाचा अन्नत्याग करूया बळीराजासाठी

अभिजित बेहते ( कृषी अभियंता )

मो: 8669187867

19 मार्च1986 शेतकऱ्यांच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस तत्कालीन उमरखेड तालुक्यातील चिलगव्हाण या गावसह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या आयुष्यावर मरणसावली टाकणारा दिवस साहेबराव करपे पाटील नावाच्या 150 एकर जमिनीचा मालक असलेला एक शेतकरी आपल्या पत्नी आणि 4 गोड लेकरांना मरणप्रवासाला घेवून जातो आणि शेवटी ” येवू दे दया आता तरी गुरु माऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली” हे भजन म्हणत स्वतः ही या क्रूर जगाचा निरोप घेतो भव्य असा वाडा अन् त्या वाड्यात घुमणारे संगीताचे सूर याच दिवशी लुप्त झाले शेतातील वडाच्या झाडाच्या पारंब्या मुक आक्रंदन करू लागल्या अख्खा गाव या सामूहिक आत्महत्येने सुन्न झाला सततची नपिकी अन् पोटऱ्या एवढा झालेला गहू वीज कनेक्शन तोडल्याने डोळ्यादेखत खाक झाला या हतबलतेने साहेबराव पाटील खचून गेले आणि पवनार च्या दत्तपूर आश्रमात त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला

साहेबराव पाटील यांनी कुटुंबासह घेतलेल्या या निर्णयास यंदा 33 वर्ष पूर्ण होत आहे. 33 चा आकडा एकमेकांच्या पाठीशी राहा याचे सूचक चिन्ह आहे शेतकरी एकमेकांच्या पाठीशी मात्र उभा राहत नाही साहेबराव यांची ही वेदना भारतातील समस्त शेतकऱ्यांची वेदना आहे.त्यांचा आत्महत्येनंतर अनेक साहेबराव काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कुणीच त्यांची दखल घेताना दिसत नाही. हा प्रश्न सात्विक भावनेतून जगभर जावा म्हणून ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी, चिमूर अंतर्गत एक पुढाकार घेतला आहे १९ मार्च २०२३ रोजी “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” या आंदोलनाची घोषणा केली. पाहता पाहता हे आंदोलन जगभर पोहचले.

  यंदा या घटनेला 33 वर्ष होताहेत.ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी चिमूर येथे अन्नत्याग करणार आहे. ज्यांना शेतकऱ्यांचा मरणसोहळा थांबावा असे वाटते त्यांनी 19 मार्च ला दिवसभर उपवास करावा. जगाला जो जगवतो त्यासाठी हा उपवास असेल. आता हे मरणाचे सोहळे थांबले पाहिजे. या मातीच्या कुशीत आता पुन्हा एखादा साहेबराव जन्म घेवू नये यासाठी हा उपवास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here