सुशिक्षित शेतकरी तरूणांनो आतातरी जागे व्हा…!
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
जीवनात असे कितीतरी संकटे येतात आणि एक दिवस निघून ही जातात पण ज्यांच्याकडे निसर्गाने, शासनाने, समाजाने जर.. पाठ फिरवली असेल तर त्यांच्या जीवनातील संकटे कधीच संपत नाही. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की, या पावण भूमीत आमचा जन्म झालेला आहे ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे पण, जेव्हा भाग्य खुलण्याची वेळ येते तेव्हा हाच समाज, निसर्ग आणि शासन सुद्धा पूर्णपणे पाठ फिरवतो तेव्हा कदाचित ते एकमत केले असतील असेच वाटते .. मग न्याय तरी कोणाला मागायला जायचे या अनुभवातून आपण गेलेले असणार . हे सर्व बघून तुम्ही कोठपर्यंत गप्प बसणार. .? असा सतत मला प्रश्न पडत आहे. कारण मी तुमच्या सारखीच एक शेतकरी भगिणी आहे. शेतकऱ्याची तसेच सुशिक्षित बेरोजगारांची काय अवस्था झालेली आहे मी जवळून बघत आहे म्हणून मला म्हणावेसे वाटते की बळीराजा आणि सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी , तरूणींनी आतातरी जागे होणे काळाची गरज आहे.
आपला हक्क मागण्यासाठी लढण्याची गरज आहे. एक गोष्ट म्हणजेच बळीराजा पेक्षा या जगात दुसरा कोणीही मोठा होऊ शकत नाही आणि समोरही होणार नाही सारा जग जाणून आहे म्हणूनच तर.. बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणतात आणि जय जवान जय किसान मोठ्या अभिमानाने नारे बोलतात असेच नारे लाख रूपये पगारावाल्यांना, श्रीमंत लोकांना, किंवा आमदारांना विषयी कोणीही का म्हणून नारे देत नाही. ..? याचा आधी विचार तुम्हीच करावे कारण तुम्ही सर्वापेक्षा श्रेष्ठ आहात पण परिस्थिती मुळे मागे आहात. ते आधीही मोठे नव्हते आजही मोठे नाहीत आणि समोर तर..कधीच मोठे होणार नाही हेही तुम्हीच जाणत आहात .कारण बळीराजा सारखा एक दिवस सुध्दा ते जगू शकत नाही व जागाला पोसूही शकत नाही म्हणून ते,स्वतः चाच विचार करुन आज लढत आहेत समाजातील इतर गोर, गरीब, बळीराजा, सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाही. ह्या सर्व गोष्टी कळताना बळीराजाला तसेच सुशिक्षित बेरोजगारांना लढा लढण्याची गरज आहे. चार दिवस झाले जिकडे, तिकडे वातावरण खराब झालेला आहे धो,धो पाऊस पडत आहे व शेतात पीक उभा आहे या विषयी बघायला कोणाकडे वेळ आहे का. .? बळीराजाच्या मालाला पाहिजे तो भाव मिळत नाही, पोरगी घरात लग्नाची झालेली आहे आणि मुलाचा शिक्षणाचा खर्च, घरात एक, एक पैशाची अडचण हे बळीराजाला माहीत असताना गप्प का. .? जगाचा पोशिंदा असताना मनात भिती कशाला. ..? ही भिती ठेवता म्हणून तुमचा विकास होत नाही सर्व बळीराजा सुशिक्षित बेरोजगार एकत्रीत येऊन लढायला पाहिजे.
महागाई एवढी वाढलेली आहे की, सर्वात जास्त त्रास गोर, गरीबांना,बळीराजाला, विधवा भगिणींना तसेच सुशिक्षित बेरोजगारांना सहन करावा लागत आहे. कारण हाताला काम नाही व कोणाची मदत मिळत नाही यामुळे जिवंतपणी तुम्हा सारख्या लोकांना मरावे लागत आहे असे जगणे तुम्हांला आवडते का. .? म्हणून आतातरी खळखळून जागे व्हा आणि आपला हक्क मागा आज याच समाजात कितीतरी सुशिक्षित बेरोजगार तरूण, तरूणी घरी आहात तुमच्या आईबाबानी मोलमजुरी करून, फाटकी साडी,फाटकी बनियान लावून, जागा जमीन विकून , स्वतः उपाशी पोटी राहून तुम्हाला शहरात शिकायला पाठवले हे कशासाठी. .? व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी का. .? की, आत्महत्या करण्यासाठी. .? आत्महत्या करणे किंवा चूकीच्या मार्गाने जाऊन जीवन संपवणे बंद करा तुम्ही या देशाचे नागरिक आहात तुम्हाला जगायचं आहे, हक्कासाठी लढायचं आहे आणि एक चांगला भारतीय नागरिक म्हणून जगायचं आहे असे चुकीचे वागणे सोडून द्या व आता सध्याच्या घडीला काय सुरु आहे त्याकडे लक्ष द्या, आज सरकारी कर्मचारी पेन्शन मागायला मोर्चे काढत आहे, लाच घेणारा मोर्च्यात सहभागी होत आहे ,शासनाचा कर्मचारी जन्मदात्या आईबाबांना वृधाश्रमात पाठवणारा सुद्धा पेन्शन मागतो आहे वास्तविक पाहता वृधाश्रम ही आमची भारतीय संस्कृती नाहीच मग ही संस्कृती कोणी आणली व कोणापासून सुरु झाली. बळीराजा, गोर,गरीबांपासून तर.. झालीच नाही. तरीही ते घाबरत नाही हे तुम्ही सर्वजण जाणून आहात व असे कितीतरी सरकारी कर्मचारी मौर्च्यात सहभागी झालेले आहेत ते कोणालाही घाबरत नाही मग तुम्ही कशाला घाबरता. ..? तुम्ही कोणाचाही विरोध करत बसू नका आणि आपला हक्क मागण्यासाठी मागे हटू नका. आज तुम्ही एकत्र आले नाही तर..या जगात तुम्हाला मदत करणारा कोणीही वाली सापडणार नाही यासाठी तुम्ही, स्वतः चे वाली, मदतगार तुम्हीच बना आणि आपल्या हक्कासाठी लढा.
रडत बसू नका, वेळ वाया घालवू नका, खचून जाऊ नका आपला हक्क व हाताला काम मिळावे व शेतातील पिकाला भाव मिळावे, बळीराजाला पेन्शन मिळावी यासाठी एकत्र या मोर्चे काढा इतरांसारखे नाही मिळेल..पण थोडं जरी शासनाची मदत मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करा. इतरांचा विरोध करत बसाल तर..हाती काहीही लागणार नाही म्हणून व्यर्थ गोष्टींचा नाद सोडून आपल्यावर कोणती परिस्थिती आलेली आहे याचा शांतपणे विचार करुन मार्गाला लागा. खास करून बळीराजाने मागे वळून बघू नये.
पेन्शन जर..इतरांना हवी आहे तीच पेन्शन बळीराजाला का नाही. .? ह्या विषयी बळीराजाने विचार करावे. दरवर्षीची नापिकी, आणि महागाईचा तडाखा याचा भार तुम्ही कोठपर्यंत वाहत राहणार. .? तुम्हीच सर्व मिळून विचार करावे.