सोन्याचा नवा उच्चांक ६० हजारांचा टप्पा पार

54

सोन्याचा नवा उच्चांक ६० हजारांचा टप्पा पार

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी  

मो:- 9284342632

सोन्याच्या भावामध्ये गेल्या १० दिवसांपासून भाववाढ होतांना दिसून येत आहे. सोमवार, २० मार्च रोजी पुन्हा ४०० रुपयांची वाढ होऊन सोन्याने ६० हजारांचा टप्पा ओलांडला.

या भाववाढीने सोने ६० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. आता त्याही पुढे भाव गेल्याने हा नवा उच्चांक ठरला आहे.

दरम्यान, दोन दिवसांवर आलेल्या गुढीपाडवा सणापर्यंत ही भाववाढ कायम राहत मुहूर्तावर आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सोने-चांदीत गुंतवणूक वाढली

अमेरिकन बँका डबघाईला आल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढू लागली व त्यांचे भाव वाढत आहे. १० मार्चपासून अधिकच भाववाढ होत असल्याने शनिवार, १८ मार्च रोजी सोने ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळा या उच्चांकीवर भावावर पोहचले होते.

सोमवार, २० मार्च रोजी त्यात आणखी ४०० रुपयांची भर पडून सोन्याने प्रथमच ६० हजारांचा टप्पा ओलांडला व ते ६० हजार २०० रुपयांवर पोहचले.

चांदीमध्येदेखील ५०० रुपयांची वाढ झाल्याने ती ६९ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली.

मुहूर्ताच्या दिवशी भाव वाढण्याची शक्यता

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सण दोन दिवसांवर आला असून त्या दिवशीदेखील मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. त्यामुळे मुहूर्तावर आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी २२ मार्चपर्यंत सोने काय भावावर पोहचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.