पुणे येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने जवान गणेश संतोष गावंडेचा मृत्यू.

64

पुणे येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने जवान गणेश संतोष गावंडेचा मृत्यू.

गोपिनाथ मोरे प्रतिनिधि

भोकरदन:- तालुक्यातील भिवपुर येथील जवान गणेश संतोष गावंडे वय 38 हे पुणे येथे सेवा बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. सेवेवर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू मावळली. भोकरदन तालुक्यातील भिवपुर येथील जवान गणेश गावंडे हे पंधरा वर्षांपासून भारतीय सैन्यदलात मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत होते.
कर्तव्य बजावताना भिवपुर येथील जवान हुतात्मा

अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांची बदली इतर ठिकाणाहून पुणे येथे मराठा बटालियन रेस कोर्स पुणे येथे झाली होती. त्याठिकाणी ते सेवा बजावत असताना चौथ्या दिवशी म्हणजे आज सोमवारी दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच भिवपुर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर बुधवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या मूळ गावी भिवपुर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे*