सिंदी रेल्वे “शौचालय नियमित उपयोग प्रमाणपत्र”  सादर न केल्याने सिंदीच्या नगराध्यक्षा पायउतार.

विशेष म्हणजे शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर न केल्याने नगराध्यक्षा अपात्र झाल्याबाबतचा हा महाराष्ट्रातील पहिलाच निकाल आहे..

भाजपा पक्षातील नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांची आपल्या मनमानी कारभार मुळे नाराजी ओढवल्याने नगराध्यक्षा आपल्या भाजपा पक्षातून बहिस्कृत करण्यात आले असा ठराव भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला होता.

मुकेश चौधरी प्रतिनिधी

वर्धा –  सिंदी रेल्वे:- 2016 साली झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेतून भरघोस मताने भाजप पक्ष्याच्या नगराध्यक्षा सौ. संगीता सुनील शेंडे ह्या विजयी झाल्या होत्या. 7 मे 2016 च्या राजपत्रानुसार निवडून आल्यानंतर 180 दिवसात घरी शौचालय असून ते नियमित वापरत असल्याबाबत चे प्रमाणपत्र “शौचालय नियमित उपयोग प्रमाणपत्र” नगर परिषदेला सादर करणे आवश्यक होते, ते सादर न केल्याने नगराध्यक्षाला अपात्र करण्याबाबत स्थानिक रहिवासी चंद्रशेखर जनार्धन बेलखोडे याने जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने 18 डिसेंम्बर 2020 रोजी जिल्हाधिकारी विवेक भीमनवर वर्धा यांनी संगिता शेंडे यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र घोषित केले.

सिंदी च्या नगराध्यक्षा यांची कारकीर्द ही मागील 4 वर्षात वादग्रस्त राहली असून याच काळामध्ये बजेट ला मंजुरी न घेता सुध्दा कामे करून बिले काढणे, त्याप्रमाणे समित्यांची निवड रद्द करणे, गणपूर्ती अभावी सुध्दा सभा घेणे, यापूर्वी पेयजल योजनेच्या खाजगीकरणा वरून नगराध्यक्षा च्या विरोधात नगर परिषद वर गावातील जनतेने एकजूट दाखवून मोर्चा काढला होता, त्यावेळी महिलांनी बाहेर येऊन नगराध्यक्षा नी निवेदन स्वीकारावे व खाजगीकरण थांबवावे अशी मागणी मोर्चेकराणी केली असता आपल्या हेकेखोर पणा मुळे मोर्चातील लोकांची नाराजी झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. आदींमुळे कारकीर्द ऐतिहासिक ठरली आहे. नगराध्यक्षा उच्चशिक्षित व विभूषित असून शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यात त्यांनी कसूर केल्याने याच बाबीचा फायदा घेत चंद्रशेखर बेलखोडे याने नगराध्यक्षा यांच्या विरोधात महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या कलम 44 (3), 44 (1), (ए), 16 (1), (एम) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार चंद्रशेखर बेलखोडे यांची बाजू अँड. परीक्षित पेटकर यांनी तर नगर परिषदेच्या वतीने अँड. राम देशपांडे यांनी मांडली. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर जिल्हाधिकारी यांनी सिंदी च्या नगराध्यक्षा ना अपात्र घोषित केले.

तक्रारदार चंद्रशेखर बेलखोडे यांची बाजू अँड. परीक्षित पेटकर यांनी तर नगर परिषदेच्या वतीने अँड. राम देशपांडे यांनी मांडली. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर जिल्हाधिकारी यांनी सिंदी च्या नगराध्यक्षांना अपात्र घोषित केले.  शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर न केल्याने नगराध्यक्षा अपात्र झाल्याबाबतचा महाराष्ट्रातील पहिलाच निकाल आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here