२०५० पर्यंत देशात होणार तीव्र जलसंकट

54

२०५० पर्यंत देशात होणार तीव्र जलसंकट

प्रफुल मदनकार

मी:7972220490

पाणी हे मानवतेसाठी रक्तासारखे असून जीवन,आरोग्य आणि लोकांच्या विकासासाठी आवश्यक आहे.आशिया खंडातील सुमारे ८०% लोकसंख्या जलसंकटाचा सामना करीत आहे.भारतासह,ईशान्य चीन,पाकिस्तानवर हे जलसंकट सर्वाधिक असून या जलसंकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे,हिमनद्या वितळल्यामुळे सिंधू,गंगा, ब्रह्मपुत्रा या प्रमुख हिमालयातील नद्यांचा प्रवाह कमी होणार आहे,२६% लोकांना अद्याप शुध्द पाणी नाही,केवळ ४६% लोकांनाच पिण्याचा पाण्याचा लाभ घेता येत आहे.

जगातील २-३ अब्ज लोक वर्षातून किमान एक महिना पाणी टंचाईशी झगडताना पहावयास मिळते,येत्या काळात हे पाणी संकट आणखी वाढणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.यात २०५० पर्यंत भारतासमोर जगातील सर्वात मोठे जलसंकट उभे राहणार असून भारतीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

१.७ ते २.४० अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागणार लागेल,म्हणून वेळ आपल्या बाजूने नाही,त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी खूप काही करायचे आहे,यासाठी एकत्र येवून कृती करणे प्रत्येकाचे उद्दिष्ट्य असायला पाहिजे त्यामुळे बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे.