माणगांवमध्ये प्रथमच श्री.रामनवमी उत्सव,रामजन्मोस्तव शोभायात्रेचे आयोजन
✍️ सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव शहरात यावर्षी प्रथमच सन 2023 रोजी समस्त माणगांवकर बांधवाकडून श्री. रामनवमी व श्री. रामजन्मोस्तव शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.30 मार्च रोजी दुपारी म्हणजे आज दुपारी 3.30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. माणगांव येथील साईमंदिर तहसील कार्यालय येथून कचेरी रोड, माणगांव बाजारपेठ, निजामपूररोड, बालाजी कॉम्प्लेक्स ते खांदाड सोनभैरव मंदिर इथंपर्यंत शोभयात्रेची सांगता होणार आहे.
माणगांव तालुक्यातील सर्व हिंदू बांधवानी या शोभयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.सायंकाळी 7.30 वाजता श्री. राम मंदीर खांदाड येते महाआरती होणार आहे.तसेच 8 वाजता महाप्रसादाचे देखील नियोजन करण्यात आला आहे. या. उत्सवादरम्यान व शोभयात्रेत कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी माणगांव पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.यावर्षी सन 2023 रोजी समस्त माणगांवकर हिंदू बांधवाकडून दि.30 मार्च रोजी श्री. रामनवमी व श्री. रामजन्मोस्तव यात्रेचे आयोजन करण्यात आला आहे. या उत्सवाला खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच माणगांव शहरात समस्त हिंदू बांधव एकत्र येत आहेत. संपूर्ण माणगांव शहर दिव्य पथक्याने सजलेला पाहायला मिळत आहे.