दोन महिन्यांच्या चिमुकलीला बापानेच जमिनीवर आपटले, मुलीचा मृत्यू झाला.

84

दोन महिन्यांच्या चिमुकलीला बापानेच जमिनीवर आपटले, मुलीचा मृत्यू झाला.

गोंदिया – अर्जुनी-मोरगाव:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करून चक्क पोटच्या पोरीला जमिनीवर आपटून मारल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली. या संतापजनक प्रकारामुळे परिसरा खळबळ उडाली आहे. भवेश केशव राऊत वय 34 वर्षे, रा. करांडली असे आरोपीचे नाव असून, नायरा भवेश राऊत वय दोन महिने सात दिवस असे मृत बालिकेचे नाव आहे.

 

अर्जुनी-मोरगाव पोलिस स्टेशनअंतर्गत मौजा खामखुरा येथे शुक्रवार, 18 डिसेंबर रोजी आरोपी भवेश केशव राऊत वय 34 वर्षे, रा. करांडली याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करून तिला मारण्याची जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भवेश नेहमीच तिला मारहाण करायचा. शुक्रवारीही दोघांचा वाद सुरू होता, परंतु नेहमीचेच असल्याने शेजाऱ्यांनी सुरू असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

परंतु पती- पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या भवेशने कसलाही विचार न करता स्वतःच्या मुलीला पाळ

 

ण्यातून काढून जमिनीवर जोरात आपटले. ज्यामुळे मुलीच्या डोक्याला जबर मार लागला. उपचारादरम्यान भंडारा सामान्य रुग्णालय येथे मुलीचा मृत्यू झाला.

पत्नीच्या तोंडी तक्रारीवरून 20 डिसेंबर रोजी अर्जुनी-मोरगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. रजिस्टर क्रमांक 342/20 भादंवि कलम 302-323-506 प्रमाणे दाखल करण्यात आला. आरोपी भवेश केशव राऊत वय 34 वर्षे, रा. करांडली तालुका अर्जुनी-मोरगाव याला अटक करण्यात आली.

पुढील तपास पोलिस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महादेव तोंडले, नायक पोलिस शिपाई विजय कोटांगले पुढील तपास करीत आहेत.