मुबंई गोवा महामार्गावर अपघात अपघातात एक इसम ठार
✍️विवेक काटोलकर ✍️
माणगांव शहर प्रतिनिधी
📞77989 23192📞
माणगांव :-मुंबई गोवा दिवसान दिवस बनलाय मृत्यूचा सापळा माणगांव तालुक्यातील विठलनगर येथे फिर्यादी इसम शंकर लिबाजी खाडेकर वय वर्ष ७० रा. पहूर पो. आठळेपाडी ता रोहा याची मावस बहीण ही मिनिडोर रिक्षातून उतरून विठ्ठलनगर येथे जाण्याकरिता रस्ता क्रॉस करीत असताना मुबंई बाजूकडून माणगांव बाजूकडे येत असलेल्या वॅगनार कार क्रमांक एम एच ४६ बी क्यू ००२७ यावरील चालक निखिल मुनील पाटणे वय वर्ष २८ रा. सी ८०३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर हॉसिंग सोसायटी सेनापती बापट मार्ग दादर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अवीचारणे अतिवेगाने वाहन चालवून हा अपघात केला.
पोलीस सूत्रांकडून मिळेलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मयत विठाबाई उमाजी देवळेकर ही विठ्ठलनगर येथे मिनिडोर रिक्षातून उतरून रस्ता क्रॉस करीत असताना वॅगनार कारने अतिवेगाने येऊन हा अपघात केल्याची घटना दि.२६ मार्च रोजी ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून मांणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसम विरुद्ध कॉ. गु. रजि. न ७४/२०२३ भा. द. वि. कलम ३०४ (अ )२७९,३३७,३३८ मो वा क अधी १८४,१३४,१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगांव पोलीस ठाण्याचे माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास म पोसई पाटील, पो हवालदार दोंडवूलकर हे करीत आहेत.