जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड दत्त टेकडी परिसरात अपघाताचे सत्र सुरूच, स्थानिकांच्या तक्रारीची मनसेने घेतली दखल

पूनम पाटगावे

जोगेश्वरी प्रतिनिधी

जोगेश्वरी :- जोगेश्वरी (पूर्व) येथील दत्त टेकडी- जे.व्हि.एल.आर च्या दोन्ही बाजुस नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. रस्ता ओलांडताना त्या ठिकाणी लहान-मोठे अपघात होत असल्याची तक्रार पत्रासह नागरिकांकडुन मनसे शाखा क्र.७३ मध्ये शाखाअध्यक्ष रमाकांत नर यांकडे देण्यात आली. विभाग अध्यक्ष श्री. बाबूभाई पिल्ले यांनी पदाधिकार्‍यांसमवेत सिप्स वाहतुक पोलिस ठाणे येथील वाहतुक पोलिस अधिकार्‍यांची भेट घेत सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल (संकेत यंत्र) बसवावे, शक्य नसल्यास झेब्रा काॅसिंग ची व्यवस्था करावी, ते ही शक्य नसल्यास आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातुन विरुद्ध दिशेने चालवणार्‍या दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती केली. आपण जर याचा गांभिर्याने विचार न करता दुर्लक्ष केलात तर मनसे आंदोलन घेईल असा इशाराही देण्यात आला. वाहतुक पोलिस प्रशासनाने यावर गांभिर्याने दखल घेत उपाय योजना करु असे आश्वासित केले.

याप्रसंगी मनसेचे विभाग अध्यक्ष बाबुभाई पिल्ले, शाखाध्यक्ष रमाकांत नर, संतोष कदम- चित्रपट सेना-चिटणीस, सौ.दक्षा घोसाळकर म.शाखाअध्यक्षा, श्रीमती.स्मिता गांगण मराठी कामगार सेना चिटणीस, सौ.प्रतिभा ताम्हणकर – मराठी कामगार सेना उपचिटणीस, सुभाष अमरे- चित्रपट सेना, रोहित मोरे उपशाखाअध्यक्ष, सदानंद मांजरेकर मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here