माणगांव साई घाटात ऍक्टिवा स्कुटीला रोखून अज्ञात स्विफ्ट कारमध्ये असणाऱ्या तीन भुरट्यानी 5 लाख 57 हजार घेऊन केला पोबारा….

✍️विवेक काटोलकर ✍️

माणगांव शहर प्रतिनिधी

📞 77989 23192📞

माणगांव :-माणगांव तालुक्यातील साई घाटात दि.31 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मोर्बा गावाच्या हद्दीत म्हसळा ते माणगांव आपल्या ताब्यातील ऍक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच 06 सी सी 7136 घेऊन आला असता पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कार क्रमांक माहित नाही ही ओव्हरटेक करून ही पुढे आडवी लावून फिर्यादी इसम यांच्या जवळ असलेली पांढऱ्या पिशवी मध्ये असलेली रोख रक्कम 5 लाख 57 हजार घेऊन पोबारा केला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे रा. चिंचवळीवाडी गोरेगाव माणगांव हा धनंजय राईस मिल तळेगाव येथे नोकरी च्या निमित्ताने रिकव्हरी करायला म्हसळा येथे गेला असता रिकव्हरी ची रोख रक्कम 5,57,349 ही पांढऱ्या पिशवीत घेऊन येत असताना मौजे मोर्बा घाट हद्दीत प्रथम पारावे याच्या स्कुटीला मारुती स्विफ्ट कारणे ओव्हरटेक करून त्याच्या समोर आडवी लावून स्विफ्ट मध्ये असणारे तीन चोरट्यानी ऍक्टिवा स्कुटी मागे लावलेल्या लाल व निळ्या रंगाची बॅग त्यातील रोख रक्कम जबरदस्तीने खेचून पोबारा केला या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं 80/2023 भा. द. वि. स. कलम 341,392,34 प्रमाणे नोंद झाली असून तीन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली स. पो. नि. सतीश आस्वर, पो हवालदार पवार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here