माणगांव तालुक्यातील चेरवली गावामध्ये दोन गटात हाणामारी 6 जखमी,10 जणावर गुन्हा दाखल
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
8080092301
माणगांव :-माणगांव तालुक्यातील चेरवली गावात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याची घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेत ६ जन जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की २ एप्रिल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी इसम सुरज शांताराम वडेकर वय वर्ष २४ रा चेरवली याच्या अंगनामध्ये आरोपी महादेव खडतर, शांताराम खडतर, कल्पेश खडतर, तन्मय खडतर प्रफुल्ल खडतर सर्व राहणार चेरवली यांनी सुरज वडेकर यांच्या अंगणमध्ये जमाव जमवून फिर्यादी यांना शिवीगाळ करून तू माझ्या भावाला काय बोललास तुला आता बगतोच असे बोलून लाकडी फाटा, लोखंडी खुर्ची हाताबुक्याने व लाथाबुक्याने मारहान केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली या मारहाणीत 6 जन जखमी झाले आहेत. या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु.रजि नं.८२/२०२३ भा. द. वि. कलम १४३,१४४,१४७,१४९,३२३,३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पो. हवालदार रावसाहेब कोळेकर, पो. हवालदार पवार हे करीत आहेत.