चेतक कंपनीच्या वार्डमधून 19 हजाराच्या स्टील व लोखंडाची चोरी
मंगेश मेस्त्री
माणगांव तालुका प्रतिनिधी
मो: 99238 44308
माणगांव :-माणगांव तालुक्यातील निजामपूररोड हद्दीत असणाऱ्या चेतक कंपनीमधून 4 एप्रिल रोजी अज्ञात इसमानी आय एस एम बी चॅनल सुमारे 20 नग व टी एम टी स्टील (25 एम एम ) 20 नग अशा प्रकारे चोरी केल्याची घटना घडली होती.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मुबंई गोवा हायवेचे इंदापूर ते लाखपाले टप्यात काम करणाऱ्या चेतक इंटरप्रायजेस कंपनीच्या स्टील वार्डमधून 4 एप्रिल व 5 एप्रिल रोजी 12 हजार रुपये किमतीचे आयएसएमची चॅनलस एकूण 12 नग सुमारे 5 फूट लांबीचे प्रत्येकी 1 हजार रुपये नग तसेच टीएमटी स्टील 20 नग 5 फूट लांबीचे सुमारे 63 रुपये नग अशा पद्धतीने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता कोणाच्याही संमतीशिवाय चोरी करून नेला होता.
या घटनेची खबर फिर्यादी अनुज नानाजी तारोने वय वर्ष 27 व्यवसाय नोकरी चेतक इंटरप्रायझेस संध्या रा. एकता पेट्रोलपंप च्या मागे ता. माणगांव मूळगांव अर्जुने मोरगाव जि. गोदीया यांनी माणगांव पोलीस ठाण्यात खबर देताच माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आरोपी यांच्यावर माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि नं कलम 92/2023 नुसार भा. द. स वि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील तपास पो. सब इन्स्पेक्टर गायकवाड, सह फौं. मगर हे करीत आहेत.