आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्राची पारोळा तालुका कार्यकारिणी जाहीर, तालुका अध्यक्ष पदी जितेंद्र कोळी यांची नियुक्ती!

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी

मो: 9284342632

दि.- 07 एप्रिल 2023 शुक्रवार रोजी आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा मेळावा जळगांव येथे मा. कॅबिनेट मंत्री डॉ.दशरथ भांडे व मेळाव्याचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, त्यात पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनामध्ये कार्यरत असलेले व आपल्या समाजा विषयीं तळमळ असलेले जितेंद्र कोळी यांनी आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक कार्याची दखल घेत आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्राचा पारोळा तालुका अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष पदी मच्छिन्द्र कोळी, पारोळा शहर अध्यक्ष पदी गोपाल कोळी, तालुका सचिव पदी भागवत कोळी, तालुका युवक प्रमुख पदी शाम कोळी, तालुका उप सचिव पदी राहुल कोळी, तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी सुरेश कोळी, तालुका संघटक पदी कैलास कोळी आदी. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मा.कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे संथापक अध्यक्ष आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली व सत्कार करण्यात आले!

या क्षणी मा. डी.वाय.एस.पी.भाऊराव बागुल, मा. मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, मा. नगर सेवक चत्रभुज आबा सोनवणे, नगर सेवक किशोर बाविस्कर, उपाध्यक्ष शंभु शेवरे, मार्गदर्शक गंभीर उन्हाळे, महासचिव मनोहर कोळी, आदिवासी एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश बाविस्कर, प्रा. संजय मोरे, राज्य संघटक प्रशांत तराड सर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रहलाद सोनवणे सर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष रविंद्र नन्नावरे, जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी, कार्याध्यक्ष प्रशांत सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख शैलेंद्र सोनवणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता तायडे, आदी मान्यवर उपस्थित होते!

या क्षणी समस्त पदाधिकारी मान्यवर व मा. कॅबिनेट मंत्री डॉ दशरथ भांडे यांच्या कळून तालुक्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना अभिनंदन करण्यात आले व पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here