सुरक्षा घोसाळकर केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित

59

सुरक्षा घोसाळकर केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित 

m

पूनम पाटगावे 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाच्या वकील ते केंद्रीय मंत्री असा संघर्षमय प्रवास केलेल्या कणखर नेतृत्व सुषमा स्वराज सामाजिक पुरास्कार देऊन समाजसेविका सुरक्षा शशांक घोसाळकर यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल आमदार अमितजी साटम व आमदार विद्याताई ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील महिलांना गौरविण्यात आले.

अनमोल हाॕल, हार्मोनी मॉल, गोरेगाव (पश्चिम) येथे आयोजित सन्मान सोहळ्यात नगरसेविका शीतल गंभीर, भाजपा मुंबई अध्यक्षा महिला मोर्चा, शलाका साळवी उपाध्यक्षा मुंबई, सरिता राजपुरे महामंत्री मुंबई ,bशशिबाला टाकसाळ महामंत्री मुंबई, संतोष मेढेकर अध्यक्ष उत्तर पश्चिम जिल्हा, सुषमा स्वराज पुरस्कार आयोजिका नगरसेविका श्रीकला पिल्लई अध्यक्षा उत्तर पश्चिम जिल्हा व बहुसंख्येने उत्तर पश्चिम जिल्ह्यातील महिला मोर्चा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देसाई उपाध्यक्षा उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चा यांनी केले.