हरभऱ्याचे करायचे काय? शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न
प्रफुल मदनकर
कृषी उद्योजक
कोट्यावधीचा हरभरा शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे.पण शेतकऱ्याला त्यांनी पिकविलेल्या मालाचा भाव मिळत नाही आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव हा मिळालाच हवा.
हा त्यांचा हक्क आहे.आजच्या घडीला हजारो टन हरभरा शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे.तेच हाल कापसाचे आहे शेतकऱ्यांच्या शेतमाल निघाला की,बाजारभाव कमी होत मग कापूस असो की अन्य शेतमल कुठल्याही परिस्थितीत त्यांना योग्य हमी भाव मिळालाच हवा. राब राब राबून शेतकरी दिवसरात्र रक्ताच पाणी करतो आणि सर्व जनतेसाठी धान्य उगवितो पण त्याच्याच शेत मालाला शासन योग्य भाव देत नाही.ही खूप मोठी आपल्या देशाची शोकांतिका आहे.
म्हणून शेतकऱ्यांना जर स्वतःचे हित जोपासायचे असेल तर संघटन करणे व एकत्रित विक्री व्यवस्था निर्माण करणे हाच एकमेव मार्ग आहे.ज्यासाठी ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनी या कुटुंबच्या ऍप मार्फत करीत आहे आणि इतर शेतकऱ्यांना जुळण्यास आव्हान करीत आहे.म्हणून आपण एकत्रित येवून यासाठी काम करणे गरजेचे आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील.