एकता नगरची सर्व धर्मीयांची भीम जयंती हा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरावा – डॉ. विजयकुमार कस्तुरे 

✍️मनोज एल खोब्रागडे✍️

सह संपादक मीडिया वार्ता न्युज

मो नं : 9860020016

चिखली : – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील तालुका चिखली येथील एकता नगर मधील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन उत्साहाने साजऱ्या केलेल्या सर्व धर्म समभावाचे तथा सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत उदाहरण व प्रतीक असलेल्या भीम जयंती सोहळ्यामध्ये या संकल्पनेचे जनक तथा प्रमुख अतिथी या नात्याने आपले विचार व्यक्त करीत असताना आपल्या सामाजिक कार्यास्तव अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी वरीलप्रमाणे उदगार काढले.

गेल्या पंचवीस पेक्षा जास्त वर्षांपासून सदर वसतीमधील सर्व धर्मीय नागरिकांच्या वतीने अत्यंत सामंजस्य पूर्ण व राष्ट्रीय एकात्मतेचे द्योतक ठरणारा असा हा अद्वितीय भीम जयंतीचा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने फुले – आंबेडकरी विचारांची पखरणंच आहे – अशा शब्दांत या कार्यक्रमात गत पंधरा वर्षांपासून आपल्या दातृत्वाचे दर्शन घडविणारे व मा. पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत जगदगुरु शंकराचार्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र उद्योजक समितीचे सचिव अशोक अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने भाष्य केले.

या प्रसंगी संजीवनी ब. उ. संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती जाधव, बहुजन साहित्य संघ, चिखलीचे सचिव शाहीर मनोहर पवार, ऋणानुबंध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर, ता. चिखलीचे संचालक व ज्येष्ठ पत्रकार प्रशांत डोंगरदिवे ई. नी महापुरुषांच्या जीवन व कर्याची माहिती देवून त्यांच्या विचारांचा वारसा चालविणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणे होय – असे सहिष्णू विचार व्यक्त करून ही काळाची गरज असल्याचे आवाहन केले.

या प्रसंगी पंचशील धम्मध्वजाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येवून सालाबादप्रमाणे अशोक अग्रवाल यांच्या तर्फे करण्यात येणाऱ्या भोजन दान समारंभाचे उदघाटन कु.सांची ज्योती अंगुलीमाल कस्तुरे, कु. अवन्या डोंगरदिवे व चि.सोहम डोंगरदिवे या चिमुकल्यांच्या हस्ते मान्यवरांना खिचडी वाटप करून आगळ्यावेगळ्या पध्दतीने करण्यात आले.

अशा या पवित्र सोहळ्यामधे बडगुजर समाज संघटनेचे अध्यक्ष विष्णू मोळके, आयुष्मती ज्योती अंगुलीमाल कस्तुरे, कु. मानसी आम्रपाली कस्तुरे, सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार महेश वाधवाणी, जहीर बादशहा, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे पवन शर्मा, भगवान पाटील, रवी शालेशा, कादर सेठ गादीवाले, मनोज शर्मा, भारत ईंगळे, भगवान ठोंबरे, वामन धांडे, विशाल पवार, सुभाष ठोंबरे, संतोष धांडे, धीरज वानखेडे,, जय खाजेकर, अनिल धांडे, शुभम नेमाडे, विलास ईंगळे, सिध्दार्थ धांडे, विश्वनाथ बावसकर, शुभम ईंगळे, आकाश वाघमारे, भगवान बावसकर, रमेश ठोंबरे, सुरेश गवई, अविनाश मोरे, बंटी ईंगळे, सुरेश मोरे, गोपाल पाईकराव, ओम नेमाडे, विजय गायकवाड, मंदाताई म्हस्के, सुमन धांडे, धृपदाबाई घेवंदे, लक्ष्मी ठोंबरे, रक्षा ईंगळे, सुनंदा धांडे, बेबीबाई गोफणे, मंगला ठोंबरे, अनिता खाजेकर, पूजा ईंगळे, अनिता मोरे, ताराबाई नाडे, जनाबाई वाघमारे, सीमा मोरे, शोभा जाधव, शांताबाई बावसकर, प्रमिला गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवाभैया ईंगळे तथा स्थानिक नागरिक व व्यापारी मंडळींनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखंड श्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here