बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

64

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,१७ एप्रिल: बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, चंद्रपूर आणि इंडियन मेडीकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन, मध्ये बुधवार 12 एप्रिल रोजी एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला, संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज यांच्या हस्ते सरस्वती व संस्थेच्या प्रेरणास्थान आदरणीय यशोधरा बजाज यांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची विधिवत सुरवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरवातीला महिलांसाठी डॉ. मुंधडा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सेमिनार घेण्यात आले. कॉलेज च्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तपासणी केंद्राची सोय करण्यात आली होती. त्यानुसार इंडियन मेडीकल असोशिएशनच्या सर्व डॉंक्टर्सच्या चमूने ठरल्याप्रमाणे वेगवेगळ्या तपासणी केंद्रात जाऊन शिबिरात उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यात इंडियन मेडीकल असोशिएशनचे एकूण ११ डॉक्टर्स सहभागी झाले होते, यात प्रामुख्याने डॉं. ऋजुता मुंधडा, डॉं. किर्ती साने, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. प्रियांका पालीवाल, डॉ रुचा पोडे, डॉ. यामिनी पंथ, डॉ. शीतल बुक्कावर, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. राहुल नगराळे, डॉ. अनुप बांगडे.

यामध्ये १७३ विद्यार्थी , ८२ विद्यार्थिनी, १४ पुरुष व ११ महिला कर्मचारी असे एकूण २८० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व डॉक्टर्सना संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरतज बजाज व कॉलेजचे प्राचार्य सतीश ठोंबरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायन्स एंड ह्युम्यानीटीज विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस. एन. विधाते, प्रा. पि. आर. मालखेडे, प्रा. सिमा नगराळे, दिपक मोगरे व अंकिता जगताप या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. शमिना अली यांनी केले. या कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर्स व उपस्थितांचे सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा निल सी. बजाज व संस्थेच्या सचिव ममता बजाज यांनी सर्वांचे अभिनंदन केले.