डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी सालेकसा येथे साजरी

अमित सुरेश वैद्य

सालेकसा प्रतिनिधी

 मो:7499237296

कुणबी महासंघ तालुका सालेकसा, व्यापारी संघ सालेकसा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती बहेकार कॉम्प्लेक्स बस स्टॉप चौक सालेकसा येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजू दोनोडे तर प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य सौ अर्चनाताई मडावी व्यापारी संघ चे सचिव राजु जैन, सामाजिक कार्यकर्ते लखनलाल अग्रवाल, माजी मनसे अध्यक्ष ब्रजभूषन बैस, विजय फुंडे, कुंदन बहेकार, रमेश अग्रवाल, वन विभाग RFO मडावी साहेब पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पंचायत समिती सदस्य सौ अर्चनाताई मडावी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या बहुजन समाजाला संविधानिक न्याय मिळवून देण्याचे काम केले आज महिलांना समाजामध्ये स्थान जे मिळालेले आहे ते बाबासाहेब यांच्यामुळेच आणि दीनदुबळ्यांना संविधानिक न्याय मिळवून देण्याचे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले. तसेच लखनलाल अग्रवाल यांनी सुद्धा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना विषयी मनोगत व्यक्त केले.

व जयंती सोहळ्यानिमित्त भीषण उष्णतेत निघालेल्या रॅलीतील भाविकांना कुणबी महासंघ तालुका सालेकसा च्या वतीनेफल वितरित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमला उपस्थित कुणबी महासंघ तालुका सालेकसा चे अध्यक्ष निलेश बोहरे, युवा कुणबी सेवा समिती सालेकसा अध्यक्ष दिशांत फुंडे, कुणबी महासंघाचे सचिव महेश बागडे, उपाध्यक्ष रवी चुटे, गिरजाशंकर मेंढे , गौरीशंकर भांडारकर, सचिन बहेकार, सुभाष हेमने, जितेंद्र शेंडे, सुरेश मेंढे, परमानंद शिवणकर, तरुण मेंढे, रोहित शिवणकर, प्रकाश ब्राम्हणकार, सचिन चुटे, आदित्य दोनोडे, रोहित चुटे, अविनाश बोहरे, अभिजीत पाथोडे, वैभव हेमने,भावेश फुंडे, ओम बहेकार, रामकृष्ण भाजीपले, दिव्यांशु बहेकार, गुणवन्त तरोने महिला कुणबी समाज सालेकसा चे अध्यक्ष निशा बागडे, उपाध्यक्ष सौ कविता येटरे, कोषाध्यक्ष शशी फुंडे, सहसचिव लता फुंडे, सौ सरिता चुटे, संघटक सौ सुषमा मेंढे, अनिता चुटे, ममता बहेकार, कविता शेंडे, अर्चना चुटे, कु. माधवी बहेकार, डिंपल चुटे, संगीता घटरे, पायल शरणागत तसेच हरीश बहेकार, डॉ. नरेंद्र नागपुरे, विनोद वैद्य, मंगल पांडे, विनायक साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जयंती चे कार्यक्रम संपन्न झाली.*

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण मेंढे यांनी केले तर आभार कुणबी महासंघ कार्यकारणी चे अध्यक्ष निलेश बोहरे यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here