मुंबई: ‘जेव्हा सैफ घरातून बाहेर पाऊल टाकतो तेव्हा मला रडूच कोसळते, मग तो चित्रिकरणासाठी जरी चालला असला तरी…’ आपल्या नात्याबद्दल भावूक होत अभिनेत्री करिना कपूरनं
नुकताच एका मुलाखतीत एक आर्श्चयचकित करणारा खुलासा केलाय.
अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान ही बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणारी जोडी आहे. ‘सैफिना’च्या या नात्याबद्दल एका मुलाखतीदरम्यान करिनाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी करिना म्हणाली, ‘जेव्हा सैफ घरातून बाहेर पाऊल टाकतो तेव्हा मला रडूच कोसळते, मग तो चित्रिकरणासाठी जरी चालला असला तरी… मला त्याची इतकी सवय झालीय की तो घरी नसला की मला फार त्याची प्रचंड आठवण येते. तो घरातून बाहेर पडतोय म्हणजे आता आपल्यापासून दूर असणार हा विचार करूनच मी प्रत्येक वेळी रडू लागते.’ असं तिनं कबूल केलं.