ग्राहक उपभोक्ता सं .समिती व पत्रकार बांधवाच्या वतिने वृद्धाश्रमास अन्नधान्य व किराणा भेट !
✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मो न: 9860020016
चिखली :- तालुक्यातील ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे ‘ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच दैनिक भारत संग्राम व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत डॉ बाबासाहेब आबेडकर जयंती निमित्त भोकर येथील वृद्धाश्रमास अन्नधान्य व किराणा भेट म्हणून दिले,भोकर येथे वृद्धाश्रमामध्ये ९ वृद्ध दाखल असून त्यांचा रोज जेवणाचा खर्च औषध उपचाराचा खर्च संचालक प्रशांत डोंगरदिवे हे करत आहेत ‘आणि करत असलेल्या चांगल्या कामाला हातभार व खारीचा वाटा असावा म्हणून ‘दैनिक भारत संग्राम चे चिखली ग्रामीण प्रतिनिधी कैलास देशमुख यांनी गहू त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब वायाळ व चिखली तालुका अध्यक्ष ज्ञानदेव वायाळ यांनी तांदूळ ‘त्याचप्रमाणे माजी पोलीस अधिकारी ‘अशोक काकडे व पत्रकार सचिन खंडारे व ग्राहक संरक्षण समितीचे विदर्भ मुख्य संघटक सुनील अंभोरे यांनी साखर, रवा खाद्यतेल आदि अत्यावश्यक सामान वृद्धाश्रमास भेट म्हणून दिले ‘यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये आश्रमाच्या वतीने सत्कार करण्यात आला ‘यावेळी चिखली तालुका अध्यक्ष ग्राहक समितीचे ज्ञानदेव वायाळ यांनी ‘वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून सेवा करणाऱ्याला नक्कीच ईश्वर पुण्य देतो असे आपले मत त्यांनी व्यक्त केले,त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब वायाळ ‘ यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले ‘तसेच ग्राहक उपभोक्ता समितीचे विदर्भ मुख्य संघटक ‘सुनील अंभोरे यांनी आपल्या भाषणामध्ये ‘ वृद्धप काळामध्ये मुलांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करावी जर मुलांनी आपल्या आई-वडिलांची सेवा केली तर वृद्धाश्रम काढायचं काम पडणार नाही ‘नंतर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा ग्राहक उपभोक्ता समितीचे विदर्भ व उपाध्यक्ष सचिन खंडारे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून ‘सांगितले की ‘खऱ्या अर्थाने प्रशांत डोंगरदिवे हे वृद्धपकाळामध्ये वृद्धांची सावली व माऊली झाली आहे ‘तेच तुमचे पुत्र असून ते करत असलेली सेवा खऱ्या अर्थाने सार्थकी लागत आहे ‘असे सुद्धा यावेळी पत्रकार सचिन खंडारे यांनी सांगितले यावेळी सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली डोंगरदिवे यांनी केले ‘यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धासह संस्थेचे अध्यक्ष लता डोंगरदिवे, सचिव अविनाश डोंगरदिवे, अंतःकला साळवे, अर्चना डोंगरदिवे, तुळशीराम डोंगरदिवे,नामदेव डोंगरदिवे, प्रियांका वानखेडे, सरोदे, भैया डोंगरदिवे, तुषार डोंगरदिवे यांच्या सह इतर उपस्थित होते.