लपून छपून नाही तर जाहीरपणे अजित पवार होणार मुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचे वक्तव्य…
जितेंद्र कोळी
पारोळा प्रतिनिधी
मो-9284342632
अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना आपण राष्ट्रवादीतच (NCP) राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यानंतरही अजित पवारांबद्दल चर्चा सुरुच आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठं विधान केलं. आहे. अमुक जागा मिळणार आहे, आता अमूक कशाला, असं लपुन छपून बोलण्यात (Maharashtra Political News) काही अर्थ नाही. अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी (Chief Minister) बसणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल (Maharashtra Political News) भाष्य केलं. अमुक जागा मिळणार आहे, आता अमुक कशाला, असं लपुन छपून बोलण्यात काही अर्थ नाही. अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच वाटतंय, नव्या उमेदीचा, 21 व्या शतकातील तिसरं दशक सुरु आहे, एक गतीमान मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहायला मिळवा. ‘कमिटमेंट’ पाळणारा मुख्यमंत्री मिळावा, असं विधान सुनील तटकरे यांनी केले आहे.
सुनील तटकरे पुढे म्हणाले, ‘मला अनेक नेत्यांचा सहवास मिळाला, स्वर्गीय वसंतदादा (Late Vasantdada), शंकरराव चव्हाण (Shankarao Chavan) आणि विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh)यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम केलं. पहिल्यांदा दादांची भेट झाली त्यावेळी कळलं‘मॅन ऑफ कमिटमेंट एकच वादा अजितदादा ही ओळख नंतर झाली.
पण शब्दाला पक्का असणारा माणूस म्हणजे अजित पवार अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी अजित पवारांचे कौतूक केलं.