डीएनआर ट्रॅव्हल्स व ट्रक यांच्यात धडक चालकासह अनेक प्रवासी जखमी
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो:8830857351
चंद्रपूर, 23 एप्रिल चंद्रपूर: नागपूर महामार्गावर वरोरा जवळ नंदोरी टोल नाका नवीन उड्डाणं पुला जवळ आज दुपारी २:३० वाजता च्या सुमारास नागपूर ला जात असलेल्या डीएनआर ट्रॅव्हल्स क्र. एम.एच. ३४ बी एच ७५७७ तर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एम.एच. ३४ ए बी ३८४० यांच्यात धडक झाली.
या घटनेत अनेक प्रवासी व चालक जखमी झाल्याची माहिती आहे. तर ट्रॅव्हल्स चा समोरील भागाचा चेंदमेंदा झाला. जखमीं प्रवाशांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वरोरा पोलीस अपघाताच्या घटनेचा तपास करित आहे.