पुस्तकाशी एकरूप होऊन जावे, कवयित्री संगीता ठलाल
संगीता ठलाल
२५ एप्रिल
कुरखेडा: कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येतील नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालय येथे, जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या, कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कवयित्री, लेखिका, समाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल उपस्थित होत्या, अध्यक्ष म्हणुन देऊळगाव येतील प्रतिष्ठित नागरिक वासुदेव कोल्हे उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी बोलताना संगीता ठलाल यांनी पुस्तक वाचणाचे फायदे कसे होतात, पुस्तक आपले मित्र असतात, सदैव त्यांच्याशी एकरुप होऊन जावे, वाचन केल्यामुळे माणूस घडत असतो त्यासाठी वाचन संस्कृती जपणे व टिकवणे अत्यंत काळजी गरज आहे.असे, आपल्या भाषणातून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणुन अशोक मडावी, सुभाष दखणे, पुंडलिक पटणे, वाचनालयाच्या सदस्या निर्मला ठलाल, अध्यक्ष संतोष ठलाल व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली. प्रास्ताविक संतोष ठलाल यांनी केले व आभार प्रदर्शन सुरज गोरटकर त्यांनी मानले.