गोपाळ समाज रायगड आयोजित राज्येस्तरीय कबड्डी स्पर्धा गोरेगाव माणगांव येथे संपन्न….

55

गोपाळ समाज रायगड आयोजित राज्येस्तरीय कबड्डी स्पर्धा गोरेगाव माणगांव येथे संपन्न….

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

माणगाव (पांडुरंग माने):-रायगड जिल्हा गोपाळ समाज यांनी संपूर्ण राज्ये स्तरीय कबड्डी स्पर्धेचे दि 22 व 23 एप्रिल रोजी आयोजन गोरेगाव येथील ऐतिहासिक जिजाऊ माता मैदानात केले होते यावेळी विदर्ध, संपूर्ण कोंकण येथून संघ दाखल झाले होते दोन दिवस अतिशय आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात कब्बड्डी चे उत्कृष्ट सामने पार पडले यावेळी विविध राजकीय तसेच समाज सेवकांनी आपली उपस्थिती दाखवली.

सामन्यांसाठी विशेष असे सहकार्य लाभले ते मा आमदार शिवसेना उपनेते तथा विधिमंडळ पक्ष प्रतोद भरतशेट गोगावले यांचे यावेळी एन आर ए ग्रुप चे संस्थापक उद्योपती नरेश जी अहिरे,गोरेगाव पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण नावले साहेब माजी आमदार कै माणिकराव जगताप यांचे सुपुत्र श्रीयेश जगताप, लोकनेते विजयराज खुळे,समाज सेवक आकाशजी पांचाळ पत्रकार भारत गोरेगावकर, गोरेगाव सरपंच जुबेरभाई अब्बासी, चिंचवली सरपंच नंदूदादा पारावे सुतार समाज जिल्हा अध्येक्ष रामचंद्रजी मेस्त्री ,माजी सरपंच कृष्णाजी तटकरे कृषीउत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांतदादा गोरेगावकर,उप सरपंच किशोर, चिंचवली वाडी ग्रामस्थ मंडळ अध्येक्ष विष्णूजी तटकरे समाज सेवक विवेक दोषी,अक्षय यादव,उप सरपंच दिनेश उचाटे, अनुज गोरेगावकर, रायगड जिल्हा गोपाळ समाज संस्थापक जयरामजी होळकर, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतजी होळकर राजा बिरवाडकर, उमेश लाड,मा.श्री.जयदेवजी कालापाड साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त चेंबूर मा.श्री.संतोषजी कालापाड मुंबई पोलीस, दत्ताराम साबळे साहेब मा.श्री.दिनेशजी शिंदे नवी मुंबई जीएसएम अध्यक्ष, अंतिम सामना दळवटणे चिपळूण विरुद्ध वाशीम या दोन संघात झाला .

त्यावेळी वाशीम संघांनी बाजी मारून प्रथम क्र रोख रक्कम 25,000 रु तसेच विशेष आकर्षण असलेला नरेशजी अहिरे यांनी दिलेलेल्या भव्य दिव्ये अशा फिरता चषक आपल्या नावे केला दुसरा क्र 20,000 व भव्ये चषक दळवटणे चिपळूण संघ, तिसरा क्र 10,000व भव्ये चषक वाशीम जी,एस,एम संघ,चतुर्थ क्र 10,000 व भव्य चषक रायगड संघ उत्कृष्ट पक्कड, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट खेळाडू यांना टॉवर फेन बक्षीस म्हणून दिले गेले यामध्ये रायगड संघाचा गौरव माने यांनी आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन दाखवून उपस्थित क्रीडा रसिकांची मने जिंकली दोन दिवस सामने पार पाडण्यासाठी गोपाळ समाज चे उप अध्येक्ष शिवाजी चव्हाण, माजी अध्यक्ष अनिल माने, खजिनदार अनंत तावडे, कबड्डी नियोजन कमेटी अध्यक्ष नितीन होळकर,आदर्श शिक्षक संजय होळकर, भिकाजी होळकर,खजिनदार विजय होळकर, सचिव जयेश माने, विजय होळकर वाकन, विजय होळकर मुंबई, दीपक साबळे,शिवाजी होळकर लक्ष्मण चव्हाण, बबन माने अजय होळकर, संजय तावडे, विकास होळकर,आदित्य माने,सुनील चव्हाण,सुनील माने जयेश चव्हाण, चेतन होळकर अक्षय होळकर,संतोष तावडे तसेच गोपळा समाजाच्या कार्य कर्त्यांनी मदत केली कबड्डी सामन्या चे धावते समलोचक अल्पेश महाडिक यांनी केले भोजन व्येवस्ता राधा कृष्ण महिला मंडळ यांनी केली होती