धीरेंद्र शास्त्रींनी (बागेश्वर धाम  महाराज) भगवान सहस्त्रार्जुन महाराजांबंद्दल केलेल्या घृणास्पद टिप्पणीची जाहीर माफी मागावी

रमेश कृष्णराव लांजेवार                 

मो.नं: 9921690779

नागपूर: धीरेद्र शास्त्रींनी हे लक्षात ठेवा भगवान सहस्त्रार्जुन महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे ते आमचे दैवत आहे.याकरीता त्यांच्याबद्दल कोणतेही अपशब्द समाज व वंशज सहन करणार नाही.त्यामुळे आपण भगवान सहस्त्रार्जुन बदल बोललेल्या शब्दाला विराम देऊन समाजाला जाहीर माफी मागावी.आम्ही भगवान राम, भगवान परशुराम, भगवान विष्णू, भगवान दत्तात्रेय या संपूर्ण देवीदेवतांना मानतो आणि पुजा अर्चाना करतो.परंतु आमचे वंशज आमचे दैवत असल्याने त्यांच्या बद्दल अपशब्द कलार समाज कदापी सहन करणार नाही ही बाब पं.धीरेंद्र शास्त्रीने लक्षात ठेवली पाहिजे.धीरेंद्र शास्त्रीने स्वतःला हिंदु धर्माचे सर्वेसर्वा समजून हिंदू धर्मात फुट पाडु नये.आम्ही सहस्त्रार्जुन महाराजांचे वंशज आहोत.कलार,कलाल, कलवार, कल्चुरी समाज संपूर्ण भारतात करोडोंच्या संख्येने आहे आणि हा समाज भगवान सहस्त्रार्जुन महाराजांना आपले दैवत मानते.अशा परीस्थितीत धीरेद्र शास्त्रींनी सहस्त्रार्जुन महाराजांना कुकर्मी, बलात्कारी, ब्राह्मण विरोधी, अत्याचारी असे घृणास्पद अपशब्द बोलून समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत व सहस्त्रार्जुन महाराजांचा घोर अपमान केला आहे.त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींनी सहस्त्रार्जुन महाराजांच्या वंशजांच्या संपूर्ण समाजाला खुली माफी मागावी.

धीरेंद्र शास्त्रींनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की कर्ण,रावण, कुंभकर्ण इत्यादींचा रामाच्या व अर्जुनाच्या हातांनी मृत्यू झाला.याचा अर्थ हा नाही की ते पापी होते.कर्ण शुरवीर होते,रावण महाग्यानी होते.पंरंतु या पृथ्वीतलावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे.त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींनी ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय वंशज असा व्देष पसरवू नये.धीरेंद्र शास्त्री म्हणतात की हैहैवंशाचे राजांसाठी भगवान परशुरामाने फरशा उचलला.ही बाब चुकीची व खोटी आहे भगवान परशुरामाने अन्याय,अत्याचाराच्या विरोधात फरशा उचलला ही बाब धीरेंद्र शास्त्रींनी लक्षात ठेवली पाहिजे.कार्तवीर्याजुन यांनी आपल्या आराधनेच्या माध्यमातून भगवान दत्तात्रेय यांना प्रसन्न केले.त्यामुळे भगवान दत्तात्रेय यांनी युध्दाच्या वेळी कार्तवीर्यार्जुन यांना हजार हाताचे बळ प्राप्त करण्याचे वरदान  दिले.त्यामुळे त्यांना सहस्त्रार्जुन संबोधल्या जावु लागले.यांनाच सहस्त्रबाहु अर्जुन सुध्दा म्हणतात. भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांच्या सोबतच सहस्त्रार्जुन यांच्या कथेचे वर्णन भागवत पुराणमध्ये पहायला मिळते.

देवतांच्या अनेक अवताराप्रमाणे सहस्त्रार्जुन महाराज हे भगवान विष्णूचे 24 वे अवतार माणल्या जाते.सहस्त्रार्जुन महाराज यांच्या नावाने सुध्दा पुराण व संग्रह दिसून येते.भारतातील संपुर्ण कलार, कलाल,कलवार, कलचुरी समाज स्वत:ला सहस्त्रार्जुन महाराजांचे वंशज मानतात.त्यामुळे कलार, कलाल, कलवार, कलचुरी समाज अनेक राज्यांमध्ये सहस्त्रार्जुन महाराजांची जयंती कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमीला दिपोत्सवाप्रमाणे मोठ्या थाटाने व उत्साहाने साजरी करून पुजा-अर्चना करतात.मध्यप्रदेशमध्ये सहस्त्रार्जुन जयंतीला सार्वजनिक सुट्टी सुध्दा असते. सहस्त्रार्जुन (सहस्त्रबाहु)हे दानी,विद्वान,महाग्याणी, महापराक्रमी, महान योध्दा आणि कर्तव्य निष्ठावान राजा होते.पौराणीक ग्रंथ व पुराणांनुसार कार्तवीर्य अर्जुन(सहस्त्रार्जुन) यांना हैह्याधिपति, दषग्रीविजयी, सुदशेन,चक्रावतार सप्तद्रवीपाधि, कृतवीर्यनंदन, राजेश्वर इत्यादी अनेक नाव असल्याचे पुराणांमध्ये वर्णन आहे.सहस्त्रार्जुन यांनी आपल्या जिवनात अनेक युद्ध लढलेत.परंतु यात रावणासोबत युद्ध महाकाय युद्ध मानल्या जाते.सहस्त्रार्जुन यांनी भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या करून 10 वरदान प्राप्त केले व चक्रवर्ती सम्राट ही उपाधी धारण केली.

नर्मदा नदीच्या काठावर सहस्त्रार्जुन व लंकापती रावण यांच्यात घनघोर महाकाय युद्ध झाले.रावण जेव्हा सहस्त्रार्जुन सोबत युद्ध करायला पोहचले तेव्हा सहस्त्रार्जुने आपल्या हजार हातांच्या बळावर नर्मदा नदीच्या वेगवान प्रवाहाला रोखले.नंतर नर्मदा नदीचे पाणी एकठ्ठा करून पाणी सोडले, ज्यामध्ये रावणासह संपूर्ण सेना नर्मदा नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये वाहुन गेली.या युद्धात रावणाचा पराजय झाला व रावणाला बंदी करण्यात आले.नंतर रावणाचे वडील महर्षि पुलत्स्य यांच्या मध्यस्थिने रावणाला सोडण्यात आले.सहस्त्रार्जुन यांचा समाजासाठी त्याग दानशुरपणा लौकिक आहे. धीरेंद्र शास्त्रींनी देश सेवा करावी व भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम उभी करावी.परंतु हिंदु धर्मात फुट पाडण्याचे काम करू नये.आजही देशात महाभारत व रामायण कालीन वंशज आहेत मग काय यांना आपणं सर्वांना अत्याचारी म्हणावे काय? त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींजी आपल्या जिभेवर थोडा ताबा ठेवा आणि सर्वच वंशाच्या लोकांना सुखसमाधानाने राहु द्यावे.धीरेंद्र शास्त्रीजी आपण भगवान सहस्त्रार्जुन महाराजांबंद्दल केलेल्या घृणास्पद टिप्पणीचा जाहीर निषेध करतो.आपण जर स्वतःला खरोखरच देशभक्त समजत असाल तर भगवान सहस्त्रार्जुन महाराजांबंद्दल केलेल्या टिप्पणीची जाहीर माफी मागावी.कारण धीरेंद्र शास्त्रींना कोणत्याही देवीदेवतांबद्दल अपशब्द बोलण्याचा तिळमात्र अधिकार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.जय सहस्त्रार्जुन महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here